
*साखरपा-* संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत येथे आमदार राजन साळवी यांच्या उपस्थित मार्गदर्शनाखाली आढावा बैठक संपन्न झाली
यावेळी बांधकाम खाते आरोग्य खाते रस्ते विभाग महसूल विभाग अंगणवाडी कृषी विभाग आदी खात्याचे अधिकारी उपस्थित होते यावेळी आमदारांनी प्रत्येक खात्याच्या बाबतीत माहिती व त्यासंबंधित ग्रामस्थांच्या समस्या व भेडसावणाऱ्या समस्या याबाबतीत अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला तर काहीविषयी अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना केल्या
यावेळी कोंडगाव बाजारपेठेतील रस्त्याच्या बाबतीत दयनीय अवस्था झाली असून कोंडगाव तिठा ते साखरपा भंडारवाडी पर्यंत कायमस्वरूपी मार्ग काढण्याचे आश्वासन देऊन हा रस्ता काँक्रिटिकरण करण्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर गणपतीपूर्वी रस्त्याचे खड्डे भरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली यावेळी आशा सेविका अंगणवाडी सेविका यांनी केलेल्या कामाचे कौतक करून त्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी आमदार राजन साळवी माजी सभापती जया माने बिडीओ भरत चौगुले रजनी चिंगळे सरपंच प्रियंका जोयशी उपसरपंच दीप्ती गांधी सर्व सदस्य विविध खात्याचे अधिकारी बहूसंख्य महिला व पुरुष उपस्थित होते