विमानात प्रवाशाचा धिंगाणा !

Spread the love

धुम्रपान अन् दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, क्रू मेंबर्सनी थेट हात-पायच बांधले…

जनशक्तीचा दबाव न्यूज | मुंबई | मार्च १२, २०२३.

एअर इंडियाच्या लंडन ते मुंबई विमान प्रवासात एका आंग्ल् भारतीय प्रवाशाने चांगलाच गोंधळ घातला. विमानात धूम्रपान आणि दरवाजा उघण्याचा प्रयत्न करणाऱ्या या प्रवाशाला चक्क क्रू मेंबरने बांधून ठेवले होते. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमानात धूम्रपान करण्यास मनाई असतांनाही तसेच तशा सूचना देखील देण्यात आल्यानंतर देखील एका मद्यधुंद प्रवाशाने विमानात सिगारेट ओढण्यासाठी गोंधळ घातला. एवढेच नाही तर विमानाचा दरवाजा देखील उघडण्याचा प्रयत्न केला. क्रू मेंबरने वारंवार सांगून देखील ऐकण्याच्या मनस्थितीत नसणाऱ्या प्रवाशाचे थेट हातपाय बांधून ठेवण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लंडन ते मुंबई एयर इंडियाचे विमान हे मुंबईविमानतळावर येत होते. यावेळी एक३७ वर्षीय प्रवाशी हा मद्यधुंद अवस्थेत होता. दरम्यान, हा प्रवासी विमानात धूम्रपान करण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, विमानात धूम्रपान करण्यास क्रू मेंबरने मनाई केली होती. मात्र, असे असतांना देखील सर्व सुचनांकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने हा प्रवाशी धूम्रपान करण्याचा प्रयत्न करत होता. याला विरोध करणाऱ्या इतर प्रवाशांसोबत देखील त्याने गैरवर्तन केले. यावेळी विमानाचा दरवाजा त्याने उघडण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याने थेट बाथरूममध्ये जात धूम्रपान केले. यावेळी अलार्म वाजायला लागला. यामुळे गोंधळ उडाला. क्रू मेंबरने बाथरूमकडे धाव घेतली. यावेळी या प्रवाशाच्या हातात सिगरेट होती. त्यांनी लगेच सिगरेट त्याच्या हातातून हिसकून घेतली. यावेळी प्रवाशाने आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली.

यावेळी त्याला जबरदस्तीने जागेवर बसवण्यात आले. मात्र, त्याने विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. यामुळे सर्व प्रवाशी घाबरले. वारंवार सांगूनही हा मद्यधुंद प्रवासी ऐकत नसल्याने अखेर क्रू मेंबरने त्याचे हातपाय बांधले आणि त्याला जागेवर बसवले. दरम्यान, त्याने स्वतःचे डोके समोरच्या सीटवर आपटण्यास सुरू केली. त्याने डॉक्टरची विचारणा करून त्याच्या बॅगेतील गोळी मागितली. सुदैवाने विमानात एक डॉक्टर होता. त्याने त्या व्यक्तीला तपासून त्याची बॅग तपासली असता गोळी सापडली नाही. त्यात एक ई-सिगारेट दिसली. दरम्यान, विमान हे मुंबई विमानतळावर उतरल्यावर क्रूमेंबरने त्याला सहार पोलिसांना स्वाधीन केले. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page