
खासदार आणि माजी खासदारांसाठी आंनदाची बातमी आहे. खासदार आणि माजी खासदारांच्या पगारात मोठी वाढ झाली आहे.
महिन्याचा पगार 1 लाख 24 हजार; खासदारांच्या पगारात डायरेक्ट 24 हजार रुपयांची बंपर पगार वाढ
नवी दिल्ली- खासदार आणि माजी खासदारांसाठी मोठी बातमी आहे. खासदार आणि माजी खासदारांचे वेतन आणि भत्ते वाढले आहेत. खासदारांच्या पगारात डायरेक्ट 24 हजार रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे खासदारांना महिन्याला 1 लाख 24 हजार इतका पगार मिळणार आहे. तर, माजी खासदारांच्या पेन्शनमध्ये 31 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
खासदारांना महिन्याला 1 लाख रुपये इतके वेतन मिळते.
खासदारांचा दैनिक भत्ता 2000 रुपयांवरून 2500 रुपये करण्यात आला आहे. तर, माजी खासदारांची पेन्शन 25,000 रुपयांवरून 31,000 रुपये करण्यात आली आहे. पाच वर्षांपेक्षा जास्त काळ खासदार राहिलेल्यांसाठी, दरवर्षी अतिरिक्त पेन्शन 2000 रुपयांवरून 2500 रुपये करण्यात आली आहे.
खासदारांचे वाढीव वेतन, भत्ते आणि पेन्शन 1 एप्रिल 2023 पासून लागू होतील. संसदीय कामकाज मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. खर्च महागाई निर्देशांकाच्या आधारे पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. 2018 पासून, खासदारांचे वेतन आणि भत्ते याचे दर पाच वर्षांनी पुनरावलोकन केले जाते. हा आढावा महागाई दरावर आधारित आहे. 2018 मध्ये खासदारांच्या वेतन आणि भत्त्यांसाठीच्या कायद्यात सुधारणा करण्यात आल्याची माहिती खासदार रविद्र वायकर यांनी दिली.
पगाराव्यतीरीक्त खासदारांना अनेक सुविधा आणि भत्ते मिळतात. खासदाराला प्रत्येक महिन्यात 70 हजार रुपये निर्वाचन क्षेत्र भत्ता म्हणून मिळतात. याव्यतिरिक्त खासदाराला दिल्लीतील आपले राहण्याचे ठिकाण किंवा दिल्लीतील कार्यालयात टेलिफोनचे शुल्क द्यावे लागत नाही. त्यांना 50 हजार मोफत लोकल कॉल्सची सुविधा दिली जाते. खासदारांना कार्यालयीन भत्ता म्हणून दर महिन्याला 60 हजार रुपये मिळतात. खासदारांना एक पास मिळतो. या पासमुळे रेल्वेमध्ये मोफत प्रवास करु शकतो. हा पास कोणत्याही ट्रेनच्या फर्स्ट क्लास एसी किंवा एक्झिक्युटीव्ह क्लासचा असतो. कामासंदर्भात परदेशी प्रवास करण्यासाठी खासदारांना स्वतंत्र भत्ता मिळतो. यासोबत वैद्यकीय सुविधादेखील पुरवली जाते.