झापुकझुपुकचा बिगबॉसमध्ये डंका:एका खेडकर अशिक्षित तरुणाने महाराष्ट्राला लावले वेड, सुरजचा ऐतिहासिक विजय…

Spread the love

मुंबई- बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये गुलीगत सुरज चव्हाणने बाजी मारली आहे. सुरुवातीपासूनच सुरज चव्हाण जिंकणार अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती आणि झालेही तसेच त्यामुळे सुरज चव्हाणवर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच सुरजने त्याच्या ओरिजिनल स्वभावाने व प्रामाणिकपणे सगळे खेळ खेळत सर्वांची मने जिंकली होती. विशेष म्हणजे सुरजवर झापुकझुपुक हा चित्रपट देखील बनविण्यात येणार आहे.

बिग बॉसच्या घरातल्या इतर स्पर्धकांना त्याने ज्या प्रकारे टास्कमध्ये टक्कर दिली याचेही अनेकदा कौतुक झाले आहे. बिग बॉसच्या घरातील कॅप्टन होण्याचीही संधी सुरजने मिळवली होती. त्यामुळे इतर दिग्गज स्पर्धकांपेक्षाही सुरज अनेकवेळा वरचढ ठरला होता. निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सुरज चव्हाण हे बिग बॉस मराठीचे फायनलिस्ट होते. यामध्ये आधी जान्हवी किल्लेकर ही नऊ लाख रुपये घेऊन त्यानंतर अंकिता वालावलकर घराबाहेर पडल्या. टॉप चार स्पर्धकांमधून धनंजयला माघार घ्यावी लागली. त्यामुळे सुरज, अभिजीत आणि निक्कीने टॉप 3 मध्ये धडक दिली. यामध्ये सुरजने बाजी मारत टॉप 2 मध्ये स्थान मिळवले. अखेर प्रेक्षकांनी दिलेल्या निर्णयानुसार सुरज विजेता ठरला.

सुरज चव्हाण कोण आहे?..

सुरज चव्हाण सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध आहे. सुरज हा बारामतीमधला आहे. सुरजचे आयुष्य हे अत्यंत खडतर गेले आहे. लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. त्यात घराची परिस्थिती देखील बिकट असल्याने त्याने केवळ आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले. सुरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सुरजचा सांभाळ केला आहे. बुक्कीत टेंगूळ, गुलीगत धोका अशा त्याच्या शब्दांमुळे आणि रिल्समुळे सुरज चांगलाच फेमस देखील झाला.

सुरजला बक्षिसाची रक्कम किती मिळाली?

सुरज चव्हाण याला बिग बॉस मराठीतील विजेयामुळे 14 लाख 60 हजार रुपये मिळाले. तसेच पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सकडून दहा लाख रुपये मिळाले. त्यासोबतच सुरज चव्हाण याला एक स्कूटर मिळाली. एका चित्रपटाची ऑफरसुद्धा सुरजला मिळाली. प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला चित्रपटाची ऑफर दिली. सुरज आगामी काळात आपल्याला झापुकझुपुक या चित्रपटात दिसणार आहे. बिग बॉसच्या सिजनमध्ये गेस्ट म्हणून आलेले असतांना उत्कर्ष शिंदे यांनीही सुरजला एक गिफ्ट दिले होते. त्यावेळी उत्कर्ष शिंदे म्हणाले की, सुरजसोबत शिंदेशाही म्हणजेत शिंदे कुटुंबीय एक गामे बनवणार आहेत.

सर्व टास्क पूर्ण करून सुरजने मिळवली ट्रॉफी..

बिग बॉस 5 चा विजेतपदासाठी सुरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांच्यामध्ये स्पर्धा होती. फिनाले दरम्यान, सुरज चव्हाण आणि अभिजीत सावंत टॉप 2 मध्ये राहिले. अभिजीत सावंत हा एक सुप्रसिद्ध गायक आणि इंडियन आयडॉलचा पहिला विजेता होता. त्याला सुरजने मागे टाकून विजेतेपद मिळवले. अभिजित उपविजेता ठरला. अभिजीतने संपूर्ण सीझनमध्ये आपला करिष्मा दाखवला.

सुरज चव्हाणचा प्रवास-

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोडवे गावात सुरज चव्हाणचा 1992 मध्ये जन्म झाला. त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. त्यामुळे त्याचे बालपण इतर सर्वसामान्य मुलांसारखे नव्हते. सुरज लहान असतानाच त्याच्या वडीलांचे कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर आजारपणामुळे आईचे देखील निधन झाले. सुरजला 5 मोठ्या बहिणी आहेत. त्यांनीच सुरजचा सांभाळ केला. काही दिवस सुरज आपल्या आत्याकडे राहिला. आई वडिलांचे छत्र हरपल्यामुळे सुरजला मजुरी करावी लागली. त्याला 300 रुपये दिवसाला मिळत होते. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. त्याचे आठवीपर्यंतचे शिक्षण झाले असले तरी त्याला मराठी वाचता येत नाही.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page