रत्नागिरी ,प्रतिनिधी : दिनांक. २२ जुलै २०२३ रोजी रात्रौ ०२:३० वाजता खेडमधील जिजामाता भाजी मंडईत आलेल्या नऊ फूट लांब महाकायमगरीला वनविभाग वन्यजीव बचाव पथकाने दीड तासाच्या अथक प्रयत्नाने सुरक्षितरीत्या पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे. मात्र यामुळे खेडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
खेड -दापोली रस्त्यावरील जिजामाता भाजी मंडई खेड येथे मगर असल्याची बातमी पोलीस स्टेशन खेड यांनी दिल्यानंतर वन विभागाचे वन्यजीव बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुमारे ९ फुट लांबीची मगर मंडईच्या शेडमध्ये बसलेली होती. मगर खूपच मोठी असल्याने मगरीस पकडणे हे वन्यजीव बचाव पथकासमोर खूप मोठे आव्हान होते. मत्रगरीला पकडण्यासाठी प्रत्येकावर कामगिरी सोपवली गेली. . प्रत्यक्ष बचाव कार्याला सुरुवात झाली. प्रथम मगरीच्या तोंडावर गोणता टाकण्यात आला. गोणता बरोबर मगरीच्या तोंडावर टाकल्याने मगरीला आजूबाजूचे दिसत नाही याची खात्री झाल्यानंतर चपळाईने मगरीवर जाळे टाकून सर्वांनी मगरीला चारही बाजूने धरून ठेवले. मगरीचे चारही पाय उचलून धरले. रस्सीच्या सहाय्याने मगरीचे तोंड व चारही पाय व्यवस्थित बांधले. नगरपरिषद खेडने तात्काळ त्यांचा ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला. जाळ्यासह मगरीला सुरक्षितरित्या उचलून ट्रॅक्टर मध्ये ठेवुन ट्रॅक्टर मधून मगरीला पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडून तपासणी करून घेवुन तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
सदरची कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्री. दिपक खाडे सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्री. बोराटे साहेब, परिक्षेत्र वन अधिकारी दापोली श्री. प्रकाश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वन्यजीव बचाव पथक खेडचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष श्री. सुरेश उपरे परिमंडळ वन अधिकारी खेड, श्री राणा बंबकर वनरक्षक खवटी, श्री. परमेश्वर डोईफोडे वनरक्षक तळे, श्री. अशोक ढाकणे वनरक्षक काडवली, श्रीम. प्रियंका कदम वनरक्षक आंबवली, श्री. छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे सदस्य श्री.
सर्वेश पवार, श्री. रोहन खेडेकर, श्री. श्वेत चोगले, श्री. सुरज जाधव, श्री. सुमित म्हाप्रळकर, श्री. यश खेडेकर,तसेच पोलीस स्टेशन खेड चे पोलीस अधिकारी या सर्वांनी मिळून खूप मेहनतीने, मोहीम यशस्वी केली.