
रत्नागिरी ॲंटी करप्शन ब्युरोची कोतवड्यात कारवाई
रत्नागिरी:- बांधकामाकरीता आवश्यक असणारा आरोग्य विभागाकडील ना हरकत दाखला तयार करण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करुन ती स्विकारताना प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडे येथे आरोग्य सहाय्यक पदावर काम करणा-या शैलेश आत्माराम रेवाळे (वय ३८) याला सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले.
▪️रत्नागिरीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हि कारवाई केली.
▪️या संदर्भातील माहिती एका प्रसिद्धि पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
युनिट – अँटी करप्शन ब्युरो, रत्नागिरी
▶️ तक्रारदार– पुरुष , वय 47 वर्षें
▶️ आरोपी लोकसेवक– शैलेश आत्माराम रेवाळे, वय- ३८ आरोग्य सहाय्यक , प्राथमिक आरोग्य केंद्र, कोतवडे, ता. जि. रत्नागिरी
▶️ लाचेची मागणी- 15,000/- रु
▶️ लाच स्विकारली- 15 ,000/-रु
▶️ हस्तगत रक्कम -15,000/-रु
▶️ लाचेची मागणी – दि. 26/10/2023 रोजी
▶️ लाच स्विकारली – दि. 31/10 /2023 रोजी
▶️ लाचेचे कारण –
तक्रारदार यांचे मालकांचे बांधकामाकरिता आवश्यक असणारा आरोग्य विभागाकडील नाहरकत दाखला मिळणेकरिता तयार केलेला अर्ज स्वीकारण्यासाठी व त्याबाबतचे कामकाज पूर्ण करून नाहरकत दाखला देण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक यांनी दिनांक २६/१०/२०२३ रोजी १५०००/- रुपये लाच रक्कमेची मागणी करून मागणी केलेली लाच रक्कम १५०००/- रुपये आज रोजी आरोपी लोकसेवक यांनी पंचा समक्ष स्वीकारली म्हणून त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
पूढील कारवाई चालू आहे.
▶️सापळा पथक –
पोलीस निरीक्षक शहानवाज मुल्ला ,पोहवा. संतोष कोळेकर ,पोहवा.विशाल नलावडे. पो. ना. दिपक आंबेकर; पो.कॉ. हेमंत पवार
▶️सापळा पर्यवेक्षण अधिकारी
श्री सुशांत चव्हाण
पोलीस उपअधीक्षक
अँटी करप्शन ब्युरो, रत्नागिरी .
👉🏻मार्गदर्शन अधिकारी
▪️.श्री. सुनिल लोखंडे सो,
पोलिस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र
▪️श्री.अनिल घेरडीकर अपर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र
श्री.सुधाकर सुराडकर; अपर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र
▶️ तपासी अधिकारी
शहानवाज मुल्ला, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो रत्नागिरी
▶️आरोपी लोकसेवक यांचे सक्षम अधिकारी
मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
रत्नागिरी जिल्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ खालील फोन व मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल.
▶️संपर्क :-
१)लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
रत्नागिरी कार्यालय फोन नं. 02352- 222893
२) श्री सुशांत चव्हाण, DYSP , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी मो.नं.9823233044
३) श्री शहानवाज मुल्ला, PI लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी मो. नं. 7774097874
4) श्री अनंत कांबळे, PI लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी मो.न. 7507417072
३) टोल फ्री:- १०६४
चला भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करू(सदरचा मेसेज आपल्या सर्व ग्रुप्स मध्ये प्रसारित करावा ही विनंती)