
उपस्थितांचा आमदार शेखर निकम यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहाण्याचा निर्धार
जनशक्तीचा दबाव, मुंबई, प्रतिनिधी- “साहेब तुम्ही कोणत्या पक्षात आहात हे महत्वाचे आम्हाला नाही तुम्ही आमचे आहात आणि आमचा ही एकच नारा तो म्हणजे आ. शेखर निकम हाच असेल” असा विश्वास कडवई गटातील व मुचरी गणातील मुबईस्थित चाकरमान्यानी देताच घोषणा आणि टाळ्यानी सभागृह दणाणून गेले.
संगमेश्वर तालुक्यातील ओझरेखुर्द गटातील मुबई चाकरमान्याचा मेळावा प्रचंड गर्दीत झाला असतानाच आजच्या दुसऱ्या मेळाव्यात गर्दीने उच्चांक केला.कडवई गट आणि मुचरी गणातील चाकरमानी प्रचंड संख्येने उपस्थित होते.
दादर येथील गवळी समाजाच्या सभागृहात हा मेळावा आ शेखर
निकम यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता मुबईमध्ये वेगवेगळ्या
ठिकाणी राहणारा चाकरमानी मुबईच्या गर्दीतून वाट काढत दाखल झाला होता.
चाकरमानी उस्फूर्त संख्येने आले आणि आ शेखर निकम यांचा सत्कार करीत ठाम विश्वास देताना स्पष्ट केले की, आम्ही मुबईमध्ये कोणत्या विचाराचे आहोत हे महत्वाचे नाही पण चिपळूण संगमेश्वर मतदार संघात आमच्यासाठी केवळ आणि केवळ आ शेखर निकम हेच असतील नव्हे तर आमचा एकच नारा आ. शेखर निकम असा विश्वास देताच सभागृहात आ निकम याच्या नामाचा जयघोष सुरू झाला.
आ शेखर निकम यांच्या स्वभाव, दानशूरपणा, आणि कार्यकर्त्याप्रती असलेली आपुलकी अनेकांनी व्यक्त केलीच बरोबर कडवई गट आणि मुचरी गणात कधी नव्हे एवढा निधी केवळ चार वर्षात आ. निकम यांनी आणला ८२ कोटी रुपयांचा निधी आ निकम यांनी विकासासाठी देऊन अनेक वर्षाचे प्रलंबित प्रश्न सोडवल्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक आणि राष्ट्रवादीचे नेते राजू सुर्वे यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला.
“मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे मला माझा कार्यकर्ता महत्वाचा आहे माझा त्याच्यावर प्रचंड विश्वास आहे. आज ही हजारोची गर्दी मला एक विश्वास देऊन गेली आहे माझी ताकद तुम्ही आणि तुम्ही सारे सज्ज आहात त्यामुळे निवडणुकी च्या मैदानात कोणीही समोर आले तरी त्याची चिंता नाही आपण यावेळेला विक्रमी मतानेच विजयी होऊ असे आ शेखर निकम यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला.
कृषी, पर्यटन, शिक्षण या त्रिसूत्री नुसार आपल्याला मतदार संघाचा विकास करायचा आहे.विकासाची जबाबदारी माझी आहे त्याची चिंता तुम्ही करू नका पण या विकासाबरोबर मतदार संघात आर्थिक स्त्रोत निर्माण करण्यासाठी पर्यटन आणि कृषीवर आपला भर असल्याचे आ. निकम यांनी स्पष्ट केले.
आ. शेखर निकम यांनी प्रचंड संख्येने आलेल्या चाकरमान्यांना भावनिक साद घालताना म्हटले की माझा आजही कोणी मोठा राजकीय मार्गदर्शक नेता नाही आणि काल ही नव्हता सामान्य जनतेची साथ हाच माझा विश्वास आणि हीच साथ मला कायम तुमच्याकडून पाहिजे आहे नव्हे तर ती मिळेल अशी भावनिक साद घालत विश्वास व्यक्त करतात साऱ्या सभागृहाने हातवर करीत घोषणा देत आ निकम यांना विश्वास दिला.
प्रदेश सरचिटणीस दिनकर तावडे, दिशा दाभोळकर, सौ पुजाताई निकम, राजेंद्र सुर्वे, राजेंद्र पोमेंडकर, बाळू ढवळे, पंकज पुसळकर, तुकाराम एडगे, संकेत खामकर, विकास बेटकर, अनिल नांदलस्कर; अण्णा पांचाळ, रघुनाथ भालेकर,राजाराम इंदुलकर, दीपक चव्हाण, संतोष भडवळकर, सहदेव सुर्वे, संतोष जाधव, रमेश डिके, संदेश गाडगे, राजेंद्र बोले, दत्ताराम शेळके, विनोद कदम, सुभाष जाधव,नितीन भोसले, मंगेश बंडागळे, बाळा पदेरे, बाळू इंदुलकर,राजेंद्र घोसाळकर, महेश नांदळजकर, अजय साबळे आदी उपस्थित होते.