मिरारोड : वसई परीसरामध्ये राहणारा सुमित वीरमणी दुबे (३०) हा बाभोळा नाका, वसई परीसरामध्ये राहत असून तो स्वतःला बिल्डर असल्याचे लोकांना सांगायचा. वेगळ्या परीसरातील नवीन बांधकाम कस्ट्रक्शन व जुन्या इमारतीमधील रिकामे प्लॅटचा तो स्वतः मालक असल्याचे लोकांना भासवायचा. त्याची नो ब्रोकर डॉट कॉम, ऑनलाईन ओएलएक्स तसेच इतर वेवसाईटवर रुम कमी किमतीमध्ये खरेदी विक्री करण्यासंबंधी माहिती प्रसारीत करीत होता.
त्याचप्रमाणे त्याच्या कंपनीच्या नावाने सोशल मिडीयावर जाहिरात टाकुन गरजु, सर्वसामान्य लोकाकडून प्लॅट बुकींगची रक्कम स्विकारायचा. रक्कम स्विकारलेल्या लोकांना प्लॅट न देता त्यांची फसवणुक करायचा. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे बांधकाम न झालेले व अस्तित्वात नसलेले प्लॅट लोकांना विक्री करुन त्यांची फसवणूक करायचा. त्या प्लॅटवर बँकेचे कर्ज घेवून ते पैसे स्वतःच्या फायदयासाठी वापरायचा. बांधकामाच्या वेगवेगळ्या साईट
दाखवून फसवणुक करत होता. अशाच प्रकारे सुमित दुबे व त्याचे इतर साथीदार यांनी प्रविण अनंत मोरे व शोएब आलम मोहम्मद मुजीब अन्सारी यांना देखिल ज्याठिकाणी प्लॅट अस्तित्वात नाहीत अशा ठिकाणाचे प्लॅट हे कमी किमतीत देतो असे म्हणून त्यांच्याकडून ६,०५,४१४ रुपये स्विकारून त्यांना प्लॅट न देता त्यांची फसवणुक केली होती. त्याबाबत आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यातील लोकांची फसवणुक करणारा आरोपी दुबे हा त्याचे नाव सचिन पाटील,
तुषार अशा नावांचा वापर करायचा तसेच त्याचे साथीदार शुभम उर्फ बाबा गणेश मिश्रा व इतर यांच्यावर आचोळे, तुळींज, माणिकपुर पोलीस ठाणे येथे ठगवाजी फसवणुकीचे व इतर ९ गुन्हे दाखल आहेत. या ठग इसमाच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत.
जाहिरात
जाहिरात