नेरळ: सुमित क्षीरसागर
माथेरान या दस्तुरी नाक्यावर एका पर्यटक वाहनाला आग लागल्याची घटना घडली.दरम्यान येथे उपस्थित असणारे पोलीस विभाग,वन कर्मचारी तर स्थानिक तरुणाच्या पुढाकाराने वेळीच खबरदारी घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला, या कर्मचारी विभागाने माती,पाणी आणि आग विझवणारे यंत्राचा वापर केल्याने कारला लागलेली आग विझवून पर्यटकांच्या वाहनांचे मोठे नुकसान होण्यापासून वाचवले आहे.
डोंबिवली येथून तीन तरुण पर्यटक हे आपल्या खाजगी वाहन घेवून जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असणाऱ्या थंड हवेचे ठिकाण माथेरान फिरण्यासाठी आले होते.दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हे तरुण वळणावळणाचा अवघड घाट चढून माथेरान दस्तुरी नाका येथे वाहन पार्किंग ठिकाणी पोहचले होते.अचानक कारच्या पुढील इंजिन बाजूकडील बोनंट खालून धूर निघण्यास सुरुवात झाली असतां.तरुणांनी कार थांबवली आणि भीतीने बाजूला झाले दरम्यान येथील वनबीभग कर्मचारी,पोलीस विभाग तर स्थानिक तरुणांनी गाडीचा बोनंट खोलला असता इंजिन बाजूला आगीने पेट घेतला होता.
वेळीच येथील कर्मचारी यांनी आग विझवण्यासाठी असलेले साहित्य वापरून तर माती आणि नंतर पाण्याचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले होते. एकूणच स्थानिक तरुण आणि शासकीय कर्मचारी यांनी दाखवली कार्यतत्परता यामुळे येथील पर्यटकांचे वाहनांचे मोठे नुकसान होता टळले.फोर्ड या कंपनीची ही महागडी पेट्रोल कार असून वाहनांचा वायर मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असावी असा अंदाज यावेळी वाहनचालकांनी लावला.