दिल्लीत भरलेल्या स्टार्टअप महाकुंभमेळ्यात जगाला भारताच्या इकोसिस्टमचे विराट रुप दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्टार्टअपची गाथा सांगताच सर्वच आवक झाले. त्यांना भारताच्या या नवीन सामर्थ्यांची नव्याने ओळख झाली.स्टार्टअपचा महापूर, कोट्यवधींची युनिकॉर्न, भारताच्या इकोसिस्टमचे जगाला विराट दर्शन
नवी दिल्ली / 21 March 2024- देशाची राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानात ‘स्टार्टअप महाकुंभ’ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 20 देशातील व्यापाऱ्यांनी हजेरी लावली. त्यावेळी स्टार्टअपच्या भारतीय मॉडलचे विराट रुप पाहून त्यांनी तोंडात बोटं घातली. महाकुंभाच्या तिसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकून आणि त्यातील आकडेवारी समजून घेताना भारतीय इकोसिस्टमचा विश्वव्यापी पसारा पाहून जग अवाक झाले. जगाला भारतीय स्टार्टअप्स आणि युनिकॉर्नची पुन्हा नव्याने ओळख झाली.
पंतप्रधानांनी दाखविले विराट रुप…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्टार्टअपची सफर जगाला घडवली. इतक्या दिवसात भारतीय स्टार्टअपने जी हनुमान उडी घेतली. त्याचे भव्य स्वरुप जगासमोर आले. पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी जगाला भारतीय स्टार्टअपची नव्याने ओळख करुन दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात 1.25 लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. तर 110 युनिकॉर्न सह भारताने तिसऱ्या क्रमांकावरुन डरकाळी फोडली आहे. भारत आता विकसनशील राष्ट्राकडून विकसीत राष्ट्राकडे भरारी घेत आहे.
तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टार्टअप महाकुंभ’ कार्यक्रमात देशातील स्टार्टअपची पाठ थोपटली. भारतीय स्टार्टअप्सची इकोसिस्टिम आता केवळ मेट्रो शहरांची मक्तेदारी उरली नाही तर आता ती ग्रामीण अर्थव्यवस्थेतही अमुलाग्र बदल घडविण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यांनी या कार्यक्रमातही तिसऱ्यांदा विजयी होण्याचा हुंकार केला. आगामी काळात भारत स्टार्टअप्सच्या जगतात अभुतपूर्व बाजी मारणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्टार्टअप इंडियाच्या भागीदारीतून हे विश्वरुप समोर आले आहे, हे नाकारुन चालणार नाही. भारत लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्टार्टअपची कमान महिलांच्या हाती…
नरेंद्र मोदी यांनी समाजाच्या बदलत्या मानसिकतेकडे पण लक्ष वेधले. भारतीय तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता नोकऱ्या पैदा करायला हव्यात. सध्या 45 टक्क्यांहून अधिकचे भारतीय स्टार्टअप्स भारतीय महिला मोठ्या दमदारपणे चालवत असल्याचे गौरद्वगार त्यांनी काढले. अंतरिम बजेटमध्ये एक लाख कोटीहून अधिकचा निधी संशोधन आणि नवविचारांसाठी राखीव ठेवल्याचे त्यांनी सांगितले.