नवी दिल्ली- रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक नुकतीच पार पडली आहे. यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात कोणतेही बदल झाले नसल्याची माहिती दिली आहे.यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून ईएमआयमध्येही तुर्तास कोणतीही वाढ होणार नाही.रिझर्व्ह बँकेनं रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवले आहेत.
तर दुसरीकडे क्रेडिट ग्रोथ आणि बँकिंग सिस्टमदेखील उत्तम स्थितीत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे. पतधोरण समितीच्या सहा पैकी पाच सदस्यांनी रेपो दर कायम ठेवण्याच्या बाजूनं मत दिलं. महागाईदेखील कमी होत असल्याचं आम्हाला दिसत आहे. गेल्या वर्षी महागाईचा दर ६ टक्क्यांपेक्षा अधिक होता. आता कमी झाला असल्याची माहिती दास यांनी दिली.