रत्नागिरी /प्रतिनिधी- रत्नागिरी ग्रामिण पोलीस ठाणे हद्दीमध्ये एम.आय.डी.सी येथील चारचाकी गाड्यांच्या शोरुममध्ये झालेला घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपीला गुजरात येथुन अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी यांना मिळाले यश मिळाले आहे.
रत्नागिरी ग्रामिण पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र. ५६/२०२४ भा.द.वि.क ४५४, ४५७, ३८० या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन समांतर तपास सुरु असताना तांत्रीक विश्लेषण व गोपनिय बातमीदार यांच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न झाल्याने सदरचे आरोपी गुजरात राज्यात वास्तव्यास असल्याचे गोपनीय बातमी मिळाली.त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील एक पथक तयार करुन गुजरात येथे रवाना करण्यात आले होते.
सदर पथकाने गुजरात येथील जिल्हा वलसाड या ठिकाणी जाऊन आरोपी याचा शोध घेतला त्यामध्ये मुरली मनोहर पवार उर्फ अॅलेक्स वय २१ वर्षे रा. अॅपेक्स बिल्डींग, सन्जन रोड, ता. उमरगाव जि. वलसाड राज्य गुजरात येथुन ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मालापैकी १) २७ हजार रुपये रोख रक्कम, २) एक लॅपटॉप, ३) आरोपी वापरत असलेला मोबाईल असा एकुण ९४,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
कारवाई पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक श्री. नितिन ढेरे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,रत्नागिरी व त्याच्या टीम ने केले.
या मध्ये १) पोउनि / कर्मराज गावडे, स्था.गु.अ.शा
२) शांताराम झोरे पोहवा/२५१, स्था.गु.अ.शा
३) नितिन डोमणे पोहवा/४७७, स्था.गु.अ.शा
४) गणेश सावंत पोहवा/३०६, स्था.गु.अ.शा
५) विजय आंबेकर पोहवा /९०९ तक्रार निवारण कक्ष
६) निलेश शेलार पोशि/३२७ तांत्रिक विश्लेषण शाखा यांनी केलेली आहे.