वॉशिंग्टन- जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेवर शटडाऊनचे काळे ढग दाटून आले आहेत. अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेतील राजकीय तज्ज्ञ तसेच सध्या उपराष्ट्राध्यक्ष असलेल्या जेम्स डेव्हिड वेंस या दोघांनीही शट डाऊनची मागणी केली पण, ट्रम्प समर्थित विधेयक अमेरिकन संसदेत मंजूर होऊ शकले नाही. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने अध्यक्ष-निर्वाचित ट्रम्प यांची फेडरल ऑपरेशन्सला निधी देण्याची आणि कर्ज मर्यादा वाढवण्याची किंवा निलंबित करण्याची सरकारी शटडाउनच्या एक दिवस आधी योजना नाकारली आहे.
अमेरिकेतील खर्च विधेयकावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत न झाल्यामुळे अमेरिकन सरकार शटडाऊनकडे वाटचाल करत आहे. शुक्रवारपर्यंत तोडगा न निघाल्यास अमेरिकेत शटडाऊन होईल, अशी परिस्थिती उद्भवू शकते. ट्रम्प समर्थित विधेयक अमेरिकन संसदेत मंजूर न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजने अध्यक्ष-निर्वाचित ट्रम्प यांची फेडरल ऑपरेशन्ससाठी निधी देण्याची आणि कर्ज मर्यादा वाढवण्याची किंवा सरकारी शटडाउनच्या एक दिवस आधी निलंबित करण्याची योजना नाकारली गेली.
गुरुवारी, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, यूएस संसदेच्या कनिष्ठ सभागृहात, रिपब्लिकन पक्षाने आणलेले खर्च विधेयक नाकारले, जे सरकारी शटडाउन टाळण्यासाठी तात्पुरता उपाय प्रदान करणार होते. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत शटडाऊन थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत तर, अमेरिकन सरकारसमोर मोठे संकट उभे राहील. ट्रम्प समर्थित विधेयकाचा उद्देश सरकारचा निधी वाढवणे आणि राष्ट्रीय कर्ज मर्यादा निलंबित करण्याचा होता. पण संसदेत हे विधेयक कनिष्ठ सभागृहात १७४ च्या तुलनेत २३५ मतांनी फेटाळले गेले. अमेरिकन सरकारची रोकड अवघ्या एका दिवसानंतर संपणार असल्यामुळे सुट्ट्यांच्या काळात संभाव्य प्रवास विलंबासह देशभरात व्यापक व्यत्यय निर्माण होईल.
सोप्या शब्दात बोलायचे तर अत्यावश्यक खर्चासाठी जेव्हा फेडरल सरकारकडे निधी संपतो तेव्हा सरकारी शटडाऊन होते. अशा परिस्थितीत, यूएस काँग्रेसने शुक्रवारी रात्रीपर्यंत निधीचे विधेयक मंजूर केले नाही तर, देशभरातील सर्व सरकारी सेवांवर व्यापक परिणाम होईल. अमेरिकेतील सरकारसमोर शटडाऊनची परिस्थिती ओढवली असून यासह फेडरल ऑपरेशन्स ठप्प पडू शकतात. परिणामी, नॅशनल पार्कपासून सीमेवरील अंमलबजावणीपर्यंत जवळपास सर्वच गोष्टींवर पडसाद उमटतील. याव्यतिरिक्त, यामुळे अंदाजे दोन दशलक्ष फेडरल कर्मचाऱ्यांचे पगार थकतील तर, परिवहन सुरक्षा प्रशासनने देखील सुट्टीच्या काळात हवाई प्रवास प्रभावित होण्याचा इशारा दिला आहे ज्यामुळे विमानतळांवर नेहमीपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागू शकते.