दिवा पश्चिम येथील, ठा.म.पा शाळेची दयनीय अवस्था? तातडीने उपाय योजना करा ; मनसे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांचा इशारा…

Spread the love

ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) दिवा पश्चिमेकडील ठामपा शाळा क्रमांक ७९/९८ मध्ये विद्यार्थ्यांना आणि शिक्षक वर्गाला मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. सदर शाळेतील प्रसाधन गृहांची स्थिती ही अत्यंत दयनीय असून विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना याचा त्रास सहन करावा लागतोय. प्रसाधन गृहातील मलनिस्सारण व्यवस्था सुस्थितीत नसल्याने शाळेतील प्रसाधन गृह अत्यंत गलिच्छ व किळसवाणी झालेली दिसून येतात ज्यामुळे प्राथमिक शाळेमध्ये शिकांपेक्षा उंदराचे वर्चस्व जास्त प्रमाणात असून संपूर्ण शाळेत त्याचा घाण वास पसरलेला असतो. ही परिस्थिती शालेय विधर्थ्यांच्या आरोग्याला घातक ठरू शकते असे म.न.से दिवा अध्यक्ष तुषार पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

शाळेतील खिडक्यांच्या काचा भग्न अवस्थेत असून त्याच परिस्थितीत विद्यार्थ्यांचे वर्ग भरवले जात असल्याचे म्हटले आहे. शालेय वर्गात फुटलेल्या काचांमुळे भविष्यात एखादा अपघात घडू शकतो. सोबतच बहुतांश वर्गातील वर्गातील फळे हे देखील फुटलेल्या अवस्थेत आहेत,ज्यामुळे शिक्षकांना मुलांना शिकवण्यात अडचणी समोर येत आहेत.

या सर्व विषयावर शाळेकडूनही याबाबतीत प्रभाग समितीला पत्रव्यवहार करण्यात आला होता पण त्यावर अजूनही कोणतीही ठा.म.पा.शिक्षण मंडळाकडून कार्यवाही करण्यात आली नाही. या शाळेची पटसंख्या व प्रगती अत्यंत चांगली असून, इथल्या शिक्षकांनी वर्गानी मुलांसाठी घेतलेल्या मेहनातीमुळे शाळेने राष्ट्रीय आणि महापालिका स्तरावर बरेच पारितोषिकेही जिंकलेली आहेत हे तुषार पाटील यांनी पत्रातून निदर्शनास आणून दिले आहे. एका बाजूला सरकारी शाळांबाबत सर्व स्तरांवर अनास्था असताना येथील शिक्षकांनी मिळवलेले यश हे वाखाण्याजोगे असून त्याला सरकारी पातळीवरून थोडासा पाठिंबा मिळाल्यास शिक्षकांच्या प्रयत्नांना अजून बळ मिळेल असे तुषार पाटील त्यांनी मत स्पष्ट केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page