भाजपा प्रदेश मुख्यालयात दिवाळी फराळाचा आनंद; पक्षाच्या कार्यालयीन कर्मचारीवृंदासोबत प्रदेश पदाधिकाऱ्यांनी साजरा केला दीपोत्सव!…

Spread the love

‘भाजपा हा केवळ राजकीय पक्ष नसून राष्ट्रहिताचे ध्येय घेऊन वाटचाल करणारा परिवार’ – आपुलकी, स्नेह आणि बंधुभावाचे दर्शन..

मुंबई : दीपावली हा प्रकाश, आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण. या सणाच्या निमित्ताने आपल्या माणसांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याला विशेष महत्त्व असते. याच भावनेतून भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश मुख्यालयात कार्यालयीन कर्मचारीवृंदासोबत दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश पदाधिकारी आणि पक्षाच्या विविध विभागांतील सहकाऱ्यांनी एकत्र येत दीपोत्सवाचा आनंद लुटला.

भारतीय जनता पार्टी हा केवळ राजकीय पक्ष नसून राष्ट्रहिताचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून कार्य करणारा एक मोठा परिवार आहे. या परिवारातील प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी आणि कार्यालयीन कर्मचारी हा संघटनात्मक वाटचालीचा महत्त्वाचा घटक आहे. पक्षाच्या दैनंदिन कामकाजात योगदान देणाऱ्या कार्यालयीन कर्मचारीवृंदासोबत दिवाळी साजरी करून त्यांच्या कार्याचा सन्मान आणि त्यांच्याप्रती असलेली आपुलकी व्यक्त करण्यात आली.

दीपावलीच्या निमित्ताने आयोजित या स्नेहमेळाव्यात सर्वांनी एकत्र येत दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. कामाच्या व्यापातून वेळ काढत सहकाऱ्यांसोबत आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली. परस्परांमधील स्नेह, जिव्हाळा, विश्वास आणि संघभावना अधिक दृढ करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमाला भाजपा महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री अजय जामवाल, आमदार सुनील कर्जतकर, प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख गोविंद येतयेकर, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष शलाकाताई साळवी यांच्यासह भाजपा परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. पक्षाच्या संघटनात्मक कार्यात कार्यालयीन कर्मचारीवृंद बजावत असलेल्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत, सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची भावना या कार्यक्रमातून व्यक्त झाली.

राजकीय आणि संघटनात्मक कामकाजाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे, आपुलकीचे आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते जपणारा हा दिवाळी फराळाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ‘आपल्या माणसांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंदच काही वेगळा असतो’, ही भावना या दीपोत्सवातून अनुभवायला मिळाली.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page