कोकण “ज्ञान तरंग सागरी मोहिमेत” एस. पी. हेगशेटये महाविद्यालयाच्या सब लेफ्टनंट प्रा. निशिता पिलणकर आणि कॅडेट हर्ष तोस्कर यांचा सहभाग…

Spread the love


रत्नागिरी दि. ४ नोव्हेंबर :- २ महाराष्ट्र नेव्हल युनिट, एनसीसी, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ओपन ज्ञान तरंग सागरी मोहीम २२ ते ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी यशस्वीपणे पार पडली. रत्नागिरी ते पालशेत असा सुमारे २५० किलोमीटरचा सागरी प्रवास या मोहिमेअंतर्गत करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध भागांतून निवडलेले ६० नौदल एनसीसी कॅडेट्स या साहसी मोहिमेत सहभागी झाले होते. २७ फूट लांबीच्या तीन डी.के. व्हेलर नौकांच्या माध्यमातून ही मोहीम पार पडली.

या मोहिमेत एस. पी. हेगशेटये महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या ए.एन.ओ. सब लेफ्टनंट निशिता जितेंद्र पिलणकर आणि द्वितीय वर्ष चा विद्यार्थी व एनसीसी कॅडेट हर्ष मोहन तोस्कर यांनी सहभाग घेतला. सागरी नौकानयनाचा अनुभव घेताना साहस, संघभावना, नेतृत्वगुण आणि शिस्त यांचे महत्त्व अनुभवण्याची संधी त्यांना मिळाली.

या मोहिमेचा उद्देश केवळ सागरी नौकानयनापुरता मर्यादित नसून महिला सक्षमीकरण, बालशिक्षण, बालमजुरी निर्मूलन, सागरी स्वच्छता आणि सागरी सुरक्षेविषयी जनजागृती करणे हाही आहे. ‘ज्ञानाच्या वाटा, प्रगतीच्या लाटा’ या संकल्पनेतून ज्ञान, सामाजिक जाणीव आणि प्रगतीचा संदेश या मोहिमेद्वारे देण्यात आला.

या उल्लेखनीय सहभागाबद्दल नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, प्राचार्य डॉ. संजय गवाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुकुमार शिंदे तसेच प्राध्यापक वृंद यांनी सब लेफ्टनंट निशिता जितेंद्र पिलणकर आणि एनसीसी कॅडेट हर्ष मोहन तोस्कर यांचे अभिनंदन केले.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page