पुढचे तीन-चार तास धोक्याचे, महाराष्ट्राच्या या भागांमध्ये वीजेच्या गडगडाटासह पावसाचा अलर्ट!

Spread the love

महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट ओढावलं आहे. पुढच्या तीन ते चार तासांमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाचा अंदाज मुंबई हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

मुंबई : महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट ओढावलं आहे. पुढच्या तीन ते चार तासांमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाचा अंदाज मुंबई हवामान खात्याने व्यक्त केला आहे. धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि नांदेड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पुढच्या तीन-चार तासांमध्ये वीजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. तसंच 30-40 किमी प्रती तासाच्या वेगाने वारे वाहतील, अशी शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार नागपूर विभागात उद्यापासून 19 मार्चपर्यंत वादळी वारे, गारपीट तसेच पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 16 आणि 17 मार्च रोजी नागपूर, चंद्रपूर तसंच गडचिरोली या तीन जिल्हयात अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

गारपीट आणि वादळी पावसामुळे मनुष्य व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. भारतीय हवामान विभागातर्फे नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागपूर , चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयांत गुरुवार 16 मार्च आणि शुक्रवार, 17 मार्च रोजी अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. त्यासोबतच 16 ते 19 मार्चपर्यंत संपूर्ण विदर्भात वादळी वारे तसेच गारांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्हयात शुक्रवार 17 मार्च रोजी अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page