
ओरोस :- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच खासदार नारायण राणे यांनी भाजपा शिंदेसेना महायुतीची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर अवघ्या काही तासांत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपा, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. मात्र, या घोषणेनंतर जिल्ह्यातील भाजपमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचे पडसाद थेट राजीनामा सत्रातून उमटले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाच्या ओरोस मंडळाचे अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आनंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर ओरोस भाजपा मंडळात खळबळ उडाली आहे. ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश उर्फ छोटू पारकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य लॉरेन्स मान्येकर, उदयकुमार जांभवडेकर, ओरोस मंडळ उपाध्यक्ष आबा मुंज, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश चिंचाळकर, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख मिळून एकूण ४३ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*