
प्रत्येकाला वाटत असतं आपलं आयुष्य आनंदात सुखसमाधानात जावं, आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टींची कमी भासू नये, मात्र तुम्हाला माहीत आह का? आयुष्यात चांगले दिवस येण्यापूर्वी काही संकेत मिळत असतात. या संकेतांबद्दल नीम करोली बाबा यांनी सांगितलं आहे. आज आपण त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
आयुष्यात चांगले दिवस येण्याच्या आधी मिळतात हे संकेत, पाहा नीम करोली बाबा यांनी काय म्हटलंय?
नीम करोली बाबा
प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं आयुष्य सुखसमाधानात जावं, आपल्यावर कोणतंही संकट येऊ नये, आपलं कुटुंब आनंदी राहावं, पण एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात आधी संघर्ष करावाच लागतो. त्यानंतर त्याला आयुष्यात चांगले दिवस पहायला मिळतात. मात्र जेव्हा आपल्या आयुष्यात चांगले दिवस येणार असतात, तेव्हा आपल्याला काही विशिष्ट संकेत मिळतात असं नीम करोली बाबा यांनी म्हटलं आहे. नीम करोली बाबा म्हणतात वेळ कधीही एकसारखी नसते. ऊन सावलीचा खेळ चालूच असतो. मात्र कडक उन्हानंतर जेव्हा तुमच्या आयुष्यात सावली येणार असते, तेव्हा काही विशिष्ट गोष्टी तुमच्यासोबत घडतात, जर या गोष्टी तुमच्या सोबत घडल्या तर समजून जा, तुमच्या आयुष्यात लवकरच चांगले दिवस येणार आहेत, जाणून घेऊयात नेमकं काय म्हटलंय नीम करोली बाबांनी.
*साधू संतांचे दर्शन होणं –* नीम करोली बाबा म्हणतात जेव्हा आपल्या मनीध्यानी नसतानाही अचानक आपल्याला एका महान साधू, संतांचं दर्शन होतं तेव्हा समजून जायचं की लवकरच आता आपली वेळ बदलणार आहे. लवकरच चांगले दिवस येणार आहेत. साधू, संताचं दर्शन होणं ही खूप भाग्याची गोष्ट असते.
*ध्यान करताना डोळ्यात अश्रू –* नीम करोली बाबा म्हणतात तुम्ही देवा समोर ध्यान करत आहात, आणि जर तुमच्या डोळ्यात अश्रू आले तर समजून जा लवकरच तुमच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे.
*स्वप्नात पूर्वज येणं –* निम करोली महाराज म्हणतात स्वप्नात तुम्हाला तुमच्या पूर्वजांनी दर्शन देणं हे एक शुभ संकेत असातात. ते तुमच्या भविष्यातील भरभराटीचे संकेत असतात.
*गाय दारात येणं –* नीम करोली बाबा म्हणतात जेव्हा आपल्या दारात गाय येते, तेव्हा तिला कधीही उपाशीपोटी दुसऱ्याच्या दारात पाठवू नका, कारण गाय दारात येणं हे एक खूप शुभ संकेत आहे. ते तुमच्या भविष्यातील भरभराटीचे संकेत असतात.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*