
“मी असेपर्यंत राणे कुटुंबात वाद होणार नाही” होऊ देणार नाही….
*कणकवली/प्रतिनिधी:-* सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यांत महायुती व्हावी, या मताचा मी आहे. यासंदर्भात उद्या बैठक होऊन जागांचा फॉर्म्युला ठरेल. या दोन्ही जिल्ह्यांत भाजपाचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसावा. युती झाल्यानंतर ८० टक्क्यांहून अधिक जागा महायुतीकडे जातील, याचा मला विश्वास आहे,” असा विश्वास खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.
*येथील प्रहार भवनमध्ये आयोजित पत्रकार*
परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी व संचालक महेश सारंग उपस्थित होते.
राणे म्हणाले, “सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांत युती व्हावी, अशी माझी इच्छा आहे. यासाठी जागावाटपाचा फॉर्म्युला उद्या ठरविला जाईल. फॉर्म्युला माझ्याकडे आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. पण मी स्पष्ट सांगतो युती व्हायलाच हवी. युतीबाबतचा अंतिम निर्णय पालकमंत्री घेत नाहीत. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवले आहेत, मग आता अडचण कोणती?” असा सवाल त्यांनी केला.
*“मी आहे तोपर्यंत राणे कुटुंबात वाद होणार नाही”*
“गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राणे कुटुंबाविषयी विविध बातम्या येत आहेत. पण मी आहे तोपर्यंत आमच्यात अंतर्गत वाद होणार नाहीत आणि मी होऊ देणार नाही. गेली ३५ वर्षे जिल्ह्यात राजकारण करतोय. सर्वांनी साथ दिली आणि यापुढेही साथ मिळेल. सर्वांची इच्छा युती व्हावी अशीच आहे,” असेही राणे म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नीतेश राणे या विषयाचा विचार करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
“राज-उद्धव ठाकरे अस्तित्व टिकवण्यासाठी बोलत आहेत”
“उद्धव ठाकरे आता शेतकऱ्यांसाठी मागण्या करत आहेत; मात्र ते मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी नेमके काय केले? त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कोणती पावले उचलली? राज आणि उद्धव ठाकरे हे फक्त आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी बोलत आहेत. सत्तेवर येण्याची क्षमता त्यांच्यात नाही,” अशी टीका राणे यांनी केली.
ते पुढे म्हणाले, “राज्यातील तीन पक्षांचे सरकार सलोख्याने काम करत आहे. त्यात काही जण विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढी वर्षे मुंबई महानगरपालिकेत सत्ता असूनही काही केले नाही. केले असते, तर आज प्रचाराची वेळ आली नसती.”
चिपी विमानसेवा आणि रेल्वे प्रकल्पावर राणेंचा आग्रह
“चिपी विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पेट्रोल खर्चालाही मान्यता मिळाली आहे. वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेसाठीचा सर्व्हे पूर्ण झाला असून, कोकण रेल्वेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने पुढाकार घेतल्यास हा प्रकल्प गती घेईल,” असेही राणे यांनी स्पष्ट केले.
“..तर शिवसेनेसोबतचे संबंध तोडू” राणे यांचा इशारा “कणकवलीत जर शिंदे शिवसेना आणि उबाठा एकत्र येत असतील, तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबतचे संबंध आम्ही तोडू” असा थेट इशारा राणे यांनी दिला.
ते म्हणाले, “राजन तेली हे शिंदे शिवसेनेत तात्पुरते आहेत. माझी आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यावर त्यांचे भवितव्य ठरेल. विशाल परब स्वतःला मोठा विचारवंत समजतात; त्यांनी भाजपावर किती टीका केली आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. माझी भेट झाल्यावर त्यांना समजेल. त्यावेळी ब्रेकिंग न्यूज मिळेल आणि वाचवायला कुणीही येऊ दे,” असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*