
ठाणे : ठाणे ग्रामीण पोलिसांत सेवेत असलेल्या शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांनी नुकत्याच बँकॉक इथं झालेल्या आशियाई सुमो कुस्ती स्पर्धेत कास्य पदक पटकावून ठाण्यासह भारताचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला आहे. शीतल यांची पुढील वर्षी किरगीस्थान (रशिया) इथं होणाऱ्या वर्ल्ड कॉम्बॅट गेम्ससाठी निवड झाली आहे. शीतल यांच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल भारतीय सुमो रेसलिंग फेडरेशनचे अध्यक्ष यतीश बंगेरा व सेक्रेटरी चंद्रशेखर शिंदे व कोच अजय साबळे यांनी त्यांचं अभिनंदन केलं व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
2003 पासून मार्शल आर्टची सुरुवात :
शीतल खरटमल यांचं मूळगाव सोलापूर असून त्यांचं शालेय शिक्षण श्री सिद्धेश्वर कन्या प्रशाला सोलापूर इथं झालं आहे. तसंच वालचंद आर्ट अँड कॉमर्स कॉलेज सोलापूर इथं महाविद्यालयीन शिक्षण झालं आहे. ज्युडो या खेळाच्या NIS कोच म्हणून 2012 मध्ये पटियाला येथून पदवी घेतली आहे. शीतल यांनी 2003 पासून मार्शल आर्टची सुरुवात केली. कराटे, ज्युडो, कुस्ती, बॉक्सिंग, तायकंडो, किंग बॉक्सिंग, बेल्ट रेसलिंग, मास्क रेसलिंग स्पर्धेमध्ये त्या सहभागी झाल्या आहेत. शीतल यांनी ज्युडो मार्शल गेम्समध्ये 11 पेक्षा अधिक वेळा देशाचे प्रतिनिधित्व केलं आहे. तसंच त्यांनी मार्शल आर्ट प्रकारात ब्लॅक बेल्ट 3 डिग्री घेतलेलं आहे. त्या अनेक शासकीय व निमशासकीय 46 पुरस्कार प्राप्त आहेत

.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व :
आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या शितल खरटमल या ठाणे ग्रामीण पोलीस दलात 2010 पासून कार्यरत असून सध्या त्या पोलीस जिम इन्चार्ज म्हणून कार्यरत आहेत. डहाणू, घोलवड, पोलीस वेल्फेअर, स्पेशल ब्रांचमध्ये त्यांनी काम केलं आहे. यापूर्वी त्यांनी साधारण 29 वेळा भारताचे प्रतिनिधित्व करून वेगवेगळ्या स्पर्धेत 76 सुवर्णपदक, 46 रजत पदक, 16 कास्य पदक प्राप्त केलं आहे. मागील वर्षी त्यांनी जपान येथील टोकियोमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कास्य पदक प्राप्त केलं होतं. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसंच त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकं जिंकली आहेत.
विविध पुरस्कारानं सन्मानित :
उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी शितल खरटमल यांना त्यांच्या मुंबई निवासस्थानी आमंत्रित करून कौतुक केलं होतं. दरम्यान, शीतल यांना आजवर टॉप 15 वुमन आयकन पुरस्कार (बंगळुरू), कोहिनुर राष्ट्रीय पुरस्कार (पुणे), सावित्रीबाई फुले पुरस्कार (मुंबई), भारत भूषण पुरस्कार (भोपाळ) अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शीतल यांना 2020 साली अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ठाणे खात्याकडून शीतल यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
भारतात या खेळाला कमी प्रतिसाद, कारण… :
“सुमो कुस्ती हा जपानचा राष्ट्रीय खेळ आहे, जो 1500 वर्षांपासून खेळला जातो. या खेळात दोन पैलवान कुस्तीच्या रिंगमधून प्रतिस्पर्ध्याला रिंगबाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतात. भारतात या खेळाला कमी प्रतिसाद मिळतो, कारण भारतीय कुस्तीकडे खेळाडूंचा ओढा जास्त आहे. भारतीय कुस्तीपटूंना देखील या अनोख्या सुमो कुस्तीमध्ये चांगलं यश मिळू शकतं. त्यासाठी प्रयत्न केले जावेत,” असं मत शितल खरटमल यांनी व्यक्त केलं आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
⁸➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*

