30 सप्टेंबर पर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान,नागरिकांनी काळजी घ्यावी – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी

Spread the love

रत्नागिरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्यात दि. 26 सप्टेंबर  ते दि. 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत मेघगर्जनेसह, वादळीवाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, सतर्कता बाळगावी, असे आवाहन, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.

दि. 26सप्टेंबर  रोजी जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह व वादळीवा-याह (ताशी 30 ते 40 किमी प्रती तास) पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. (यलो अलर्ट)

दि. 27 सप्टेंबर व 28 सप्टेंबर  रोजी जिल्हयातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. (ऑरेंज अलर्ट)

दि. 29 व 30 सप्टेंबर रोजी जिल्हयातील काही भागात मुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. (यलो अलर्ट)

या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी.

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा. विजा चमकल असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.

विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.

धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका

विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा

शेडमध्ये आसरा घेऊ नका. वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी APP’ डाऊनलोड करून घ्यावे. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.

कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंक्षण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी  – 02352-226248 /222233, व्हाटसअप 7057222233, जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष 02352-222222, पोलीस टोल फ्री हेल्पलाईन 112, जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी -02352- 222363, महावितरण, रत्नागिरी नियंत्रण कक्ष – 7875765018, तहसिल कार्यालय रत्नागिरी – 02352-223127, तहसिल कार्यालय लांजा – 02351-230024, तहसिल कार्यालय राजापूर – 02353-222027, तहसिल कार्यालय संगमेश्वर – 02354-260024, तहसिल कार्यालय चिपळूण – 02355-252044 / 9673252044,  तहसिल कार्यालय खेड – 02356-263031, तहसिल कार्यालय दापोली – 02358-282036 तहसिल कार्यालय गुहागर – 02359-240237, तहसिल कार्यालय मंडणगड – 02350-225236

हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in// या संकेतस्थळावरून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (02352) 222233 / 226248 किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर संपर्क करा. हवामान विभागाकडून दिलेल्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमतेची काळजी घ्यावी.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t  कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा

आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..

“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी  7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav  वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page