साखरपा देवरुख मार्गांवर सुप्रसिद्ध केतकर ज्वेलर्स च्या मालकांचे अपहरण आणि लूट,तालुक्यात खळबळ, पोलिसांची पथके तपासासाठी रवाना, युद्ध पातळीवर तपास सुरु….

Spread the love

देवरुख/ प्रतिनिधी/दि १८ सप्टेंबर- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील केतकर ज्वेलर्सचे मालक धनंजय गोपाळ केतकर वय ६३ यांना काल रात्री दहा ते साडे दहा वाजण्याच्या सुमारास साखरपा देवरुख मार्गांवरील वांझोळे पासून एक किलोमीटर अंतरावर अज्ञातानी अपहरण करून लुटले.

मिळालेल्या माहिती नुसार धनंजय केतकर हे काल रात्री साखरपा येथून घरगुती कार्यक्रम आटपून देवरुख येथे जात असताना वांझोळे येथून एक किलोमीटर अंतरावर अज्ञात व्यक्तींनी गाडीची पाठलाग करून गाडीला गाडी घासली व वाटेतच गाडीची नुकसान भरपाई मागू लागले मात्र या गडबडीत केतकर हे गाडीतून उतरताच त्यांच्या अंगावर बुरखा टाकून त्यांना जबरदस्तीने हल्लेखोरांनी आपल्या गाडीत कोंबले आणि वाटुळ जवळ आणले व मोठ्या रकमेची मागणी केली त्यांच्या जवळील सुमारे पंधरा लाखाचे दागिने रोख वीस हजार काढून घेतले व केतकर यांना तोंडाला व अन्य ठिकाणी मारहाण करून सोडून दिले.

या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह तपासाची चक्रे फिरवण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जातीने लक्ष घालून तपासाची चक्रे फिरवली असून अज्ञताचा शोध सुरु असल्याचे समजले असून पोलीस यंत्रणे ने भरपूर सहकार्य केले आहे

माजी जिल्हा परिषद सदस्य बापू शेट्ये यांनी देखील देवरुख येथे आपल्या सहकाऱ्यांसह मार्लेश्वर फाट्याजवळ फिल्डिंग लावली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी कसून या घटनेची दखल घेतली आहे केतकर यांच्या किडनॅपिंगमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे

याबद्दल अज्ञात इसमांच्या विरुद्ध रजि.नं.104/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम गुन्हा 311,309 (4),310 (1),140 (2),127(2),115(2), 351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page