
दीपक भोसले/संगमेश्वर/दि २३ ऑगस्ट- संगमेश्वर येथील प्रसिद्ध प्रेस फोटोग्राफर मकरंद सुर्वे यांच्या मातोश्री विभावरी राजाराम सुर्वे (वय 80 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सुर्वे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
त्या शांत स्वभावाच्या व कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात. त्यांच्या पार्थिवावर संगमेश्वर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात मुलगा , सून, नातू असा परिवार आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर