
पेन /रायगड /प्रतिनिधी- जे. एस. डब्ल्यू कंपनीने दिनांक 22/08/25 रोजी जे. एस.डब्ल्यू कंपनी मध्ये सुरू होणाऱ्या तिसऱ्या फेज ची जन सुनावणी आयोजित केली आहे. मी ॲड. काशिनाथ जगन्नाथ ठाकूर या जन सुनावणीस प्रखर विरोध करीत आहे. कारण कोकणचा प्रवेशद्वार असलेल्या पेण तालुक्याच्या ठिकाणी जे. एस.डब्ल्यू कंपनी आहे.
कोकण म्हणजे निसर्गाने दिलेले एक वरदान अथांग समुद्र किनारा पण जेव्हा पासून जे. एस.डब्ल्यू पूर्वीची निपॉन ही कंपनी कोकणचे प्रवेशद्वार पेण तालुक्यातील डोलवी या गावात धरमतर खाडी किनारी आल्यापासून निसर्गाची विशेष करून समुद्रातील जैविक साधन संपत्तीची पूर्णविनाश झालेलाा आहे. तिसऱ्या फेज सुनावणी फेज साठी विरोध असण्याचे प्रमुख कारणे खालील प्रमाणे.
1) जे.एस.डब्ल्यू कंपनीमध्ये येणाऱ्या मोठ्या मोठ्या जहाजांमुळे खाडी किनारी मच्छीमारी करून उपजीविका करणारे आगरी, कोळी, बांधव यांचा मच्छीमारी व्यवसाय पूर्णपणे बंद होऊन देशोधडीला लागले. कारण जहाजांच्या इंजिनमुळे होणाऱ्या आवाजामुळे समुद्रातून धरम तर खाडीकिनारी येणारे मासे पूर्वेसारखे येत नाहीत..
2) मोठ मोठे जहाज जे. एस. डब्ल्यू कंपनीत येताना त्यातून होणाऱ्या लाटांमुळे समुद्रकिनाऱ्याची पूर्णपणे धूप झाले असून खाडी किनाऱ्याची बंदिस्त हे पूर्णपणे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे खारेपाटातील अनेक लोक हे जीव मुठीत घेऊन राहत आहेत. हे सध्या सुरू असलेल्या फक्त दोन फेज मूळ जैविक व मानवी जीवनास समुद्र मार्गे होणारे धोके.
3) जे. एस .डब्ल्यू चे आत्ता सुरू असलेले फेज वन व फेस 2 यांच्या चिमणीतून जो प्रदूषणकारी धूर निघत आहे. त्यामुळे परिसरात असलेली नैसर्गिक डोंगरावरील झाड, पान, यांच्यावर ही धूळ बसून ती पूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

4) चिमणीतून निघणारे प्रदूषणकारी धूर याच्यामुळे कंपनीच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोकांना श्वसनाचे आजार, तसेच चर्मरोग, वायु प्रदूषणामुळे कॅन्सर असे भयंकर आजारांना लोकं सामोरे जात आहेत. हे असे सद्यस्थितीत चालू असलेल्या फक्त फेज वन आणि फेस टू मुळे एवढा मोठा भयंकर वायू आणि ध्वनी प्रदूषण होत असल्याने आजूबाजूच्या परिसरात श्वसनाचे रोग, त्वचारोग, डोळ्यांचे आजार, तसेच शेती पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. फळझाड नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मासेमारी पूर्णपणे बंद झालेली आहे. फेज वन व फेज टू मुळे या भयंकर घडणाऱ्या वायू प्रदूषण बाबत कंपनीने आजपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना केलेली दिसत नाही.
त्यातच जे.एस.डब्ल्यू कंपनीने आता फेज थ्री करिता प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे प्रस्ताव सादर केला आहे. पूर्वीचा फेज वन व फेस टू चा अनुभव पाहता फेस थ्री च्या विस्तारासाठी प्रदूषण महामंडळाने जर परवानगी दिली. तर आजूबाजूस राहणाऱ्या पंचक्रोशीतील रहिवाशांचे जीवनमान पूर्णपणे उध्वस्त होईल. निसर्ग साधन संपत्ती उध्वस्त होईल, समुद्रातील जैविक साधन संपत्ती नष्ट होईल, म्हणून मी ॲड. काशिनाथ जगन्नाथ ठाकूर (सामाजिक कार्यकर्ता) कंपनीच्या फेस थ्री च्या विस्तारास हरकत घेत आहे. त्यातच दिनांक 22/ 8 /2025 रोजी आयोजित केलेल्या जन सुनावणीस विरोध करीत आहे. तरीही कोणी दबावाला बळी पडून जन सुनावणी घेतली आणि कंपनीच्या फेज 3 विस्तारणी करण्यासाठी परवानगी दिली. तर मी जे. एस.डब्ल्यू कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आत्मदहन करीन.!! माझ्या आत्मदाहणानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी जे.एस.डब्ल्यू कंपनी डोळवी रायगड आणि उपप्रादेशिक अधिकारी रायगड- 2, प्रादेशिक कार्यालय/ उपप्रादेशिक कार्यालय रायगड-2, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ- रायगड भवन यांची राहील.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर