
मकरंद सुर्वे/ संगमेश्वर- श्री. संतोष भागवत हे, उप अधीक्षक भूमी अभिलेख संगमेश्वर या पदावरून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा निरोप समारंभ 30जून 2025 रोजी देवरुख येथील माटे भोजने हॉल येथे आयोजित करणेत आला होता.
त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि. प. अध्यक्ष श्री. रोहन बने, जेष्ठ समाज सेवक श्री. युयुत्सु आर्ते, माजी जि. प. सदस्य श्री. बापू उर्फ संदेश शेट्ये, जेष्ठ उद्योजक श्री. बबनराव पटवर्धन तसेच समाजातील सर्व स्तरातील मान्यवर व्यक्ती, श्री. भागवत यांचे कुटुंबीय व चाहता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
भूमी अभिलेख खात्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचारी देखील आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी श्री. भागवत यांच्या शासकीय सेवेतील योगदाना बद्दल गौरवोदगार काढले.
सुमारे 39 वर्षाहून जास्त सेवा करून निवृत्त होत असताना समाजाप्रती असलेली आपुलकी व मिळालेल्या प्रेमाचा उल्लेख श्री. भागवत यांनी आवर्जून केला. तसेच या पुढे देखील सर्व सामान्यांसाठी वेळ देणार असलेचे जाहीर केले.
या प्रसंगी पुढे बोलताना श्री. भागवत म्हणाले की…
1986 साली शासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर आजतागायत कोकणातील बहुतेक जिल्ह्यात सेवा बजावली. दुर्गम भागात सेवेची सुरुवात झाल्यामुळे सर्व सामान्यांच्या समस्या, भूमी अभिलेख खात्या बद्दल असलेली अल्प माहिती, पोट हिस्सा मोजणी वेळी निर्माण होणाऱ्या अडचणी या बाबत जनतेत आपल्या परीने जागृती करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालय, MIDC या अन्य आस्थापनामध्ये प्रतिनियुक्ती काम केले.
आपल्या कार्यकाळात एनरॉन प्रकल्प गुहागर, चिपी जिल्हा सिंधुदुर्ग येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ, खोपी, शिरगांव, कुंभाड येथील धरण कालवे, अतिरिक्त लोटे परशुराम Midc संपादन प्रक्रिया, लांजा देवरुख येथील जलसंधारण प्रकल्प या कामांमध्ये सक्रिय कामगिरी केली.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करून इथपर्यंत प्रवास संघर्ष म मय होता…
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शासकीय सेवेला सुरुवात करताना अनेक समस्याचा सामना करावा लागला. डोंगर दऱ्यातील मोजणी काम असो. जेवण खाणे, गाव वस्तीवर मुक्कामी राहणे. ST बस शिवाय पर्याय नसणे. अशा अनेकविध अडचणी होत्या. आता सारखी मोबाईल ची व्यवस्था नव्हती. पोष्टाच्या कारभारावर अवलंबून रहावे लागे.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरुवातीचा कार्यकाळ व्यतित झाला. कुटुंबाची खुशाली फक्त पत्रव्यवहार केल्यावरच मिळायची. त्याही परिस्थितीत कामात कसूर होऊ दिली नाही. याचा आनंद असलेचे श्री. भागवत यांनी सांगितले. वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन, सहकारी कर्मचारी यांची साथ, कुटुंबाने दिलेला पाठिंबा या जोरावर एवढी प्रदीर्घ सेवा करू शकलो असे श्री. भागवत यांनी नम्रपणे नमूद केले. त्यांनी चिपळूण व लांजा या तालुक्यांचा अतिरिक्त पदभार देखील सांभाळला आहे.
अनेक मान्यवरांकडून व सर्वसामान्य नागरिकांकडून साहेबांचे आभार आणि शुभेच्छांचा वर्षाव…
उपाधीक्षक भूमी अभिलेख देवरुख मध्ये कार्यभार स्वीकारल्यापासून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणे मध्ये त्यांनी घेतलेली मेहनत वाखण्याजोगी होती. त्यामुळे आठ दिवस अगोदर पासूनच देवरुख येथे अनेक लोकांनी साहेबांना शुभेच्छा दिल्या. निवृत्त कर्मचारी असो वा सर्वसामान्य नागरिक किंवा वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी भागवत यांचे सर्वांनी कौतुक केले. मुंबई गोवा हायवे मध्ये प्रलंबित प्रश्नासाठी त्यांनी वारंवार स्वतः जागेवर जागून प्रश्न सोडवले. याव्यतिरिक्त व सामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लावले. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला निरोप देण्यासाठी कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती. असे असे प्रेम मिळवणारे अधिकारी फार कमी असतात या कार्यक्रमावरून जाणवले असे अनेकांनी यावेळी बोलून दाखवले. अनेक लोकांनी त्यांचे अनुभवही यावेळी बोलून दाखवले. अशा कर्तव्यदक्ष सामान्यांचे प्रश्न मार्गी लावणाऱ्या अधिकाऱ्याला निरोप देताना सर्वसामान्य नागरिक प्रशासकीय अधिकारी कौतुकाचे अनुभव बोलून दाखवले.

क्रीडा क्षेत्र असो किंवा सामाजिक काम किंवा आपल्या समाजाचे काम प्रत्येक क्षेत्रामध्ये भागवत यांचा सहभाग…
क्रीडा क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रम व साहेब यांचा सहभाग प्रत्येक कार्यक्रमांमध्ये होता. अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. अनेक बक्षीस हे त्यांनी मिळवलेले आहेत. आपल्या कार्यालयाच्या क्रीडा स्पर्धेमध्ये स्वतः सहभागी होत व आपल्या कर्मचाऱ्यांनाही सहभाग घेण्यास मार्गदर्शन करत यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवल्या. अनेक युवकांना स्पर्धा परीक्षा व त्याच्या शासकीय नोकरी संदर्भ मध्ये मार्गदर्शन करतानाही ते दिसून आलेले आहेत. त्यांच्या समाजाच्या कार्यामध्ये ही त्यांचा मोलाचा वाटा आहे. समाजाच्या कार्यक्रमांमध्ये येते सहभाग व वेळ देत होते असे यावेळी लोकांनी बोलून दाखवले.
39 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे मानले आभार मानल…
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून कामाला सुरुवात करून आज 39 वर्षानंतर सेवेतून निवृत्त होत असताना त्यांनी त्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानले. यावेळी त्यांनी आवर्जून आपल्या परिवाराचे ही आभार मानले. परिवाराच्या सहकार्यामुळे सर्व शक्य झाले असे त्यांनी यावेळी बोलूनही दाखवले. गेल्या ३९ वर्षाच्या सेवेत खूप सहकारी, मित्रपरिवार,नातेवाईक यांनी प्रेम,आपुलकी, साथ दिली त्यांचे देखील श्री. भागवत यांनी आभार मानले.