
चिपळूण : चिपळूण आगारात नवीन दाखल झालेल्या पाच एस. टी. बसेसचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते नुकताच पार पडला. यावेळी आमदार श्री. शेखर निकम, माजी सभापती शौकतभाई मुकादम, सौ. पूजाताई निकम, जयद्रथ खताते, नितीन ठसाळे, दिशा दाभोळकर, तसेच आगार व्यवस्थापक श्री. चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या नव्या बसेसमुळे प्रवाशांना अधिक चांगली सेवा उपलब्ध होणार असून, चिपळूण आगाराच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होणार आहे.



चिपळूण एस. टी. आगारासाठी प्राप्त झालेल्या नुतन 5 बसेसचे लोकार्पण कार्यक्रम मा. श्री. भास्करशेठ जाधव व चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे आमदार शेखर निकम हस्ते मा. मान्यवरांच्या उपस्थितीत चिपळूण आगार येथे संपन्न झाला. चिपळूण आगारातील बसेसची कमतरता, प्रवास्यांची होणारी अडचण पाहता मा. परिवहन मंत्री यांचाकडे पाठपुरावा करून चिपळूण आगारासाठी 10 नुतन बसेसची मागणी आमदार शेखर निकम यांनी केली होती. त्यानुसार चिपळूण आगारासाठी प्राथमिक स्वरुपात प्रथम 5 बसेस प्राप्त झाल्या असून उर्वरीत 5 बसेस लवकरच आगाराला मिळणार आहेत. असे कार्यक्रमाच्या वेळी शेखर निकम यांनी सांगितलं.