
नवी दिल्ली :- इंडियन एअरफोर्समध्ये (भारतीय हवाई दलात) जाण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय हवाई दलाच्या अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर वायू प्रवेश 1/2026 (AGNIVEERVAYU INTAKE 02/2026) भरती प्रक्रियेची घोषणा करण्यात आली आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया ११ जुलै २०२५ पासून सुरू होईल. तसेच, ऑनलाइन परीक्षा २५ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येईल. इच्छुक उम्मीदवार agnipathvayu.cdac.in वर जाऊन अर्ज करू शकता.
कुणाला करता येईल अर्ज ?
या भरती प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या उमेदवराचे किमान वय १७.५ वर्ष तर जास्तीत जास्त वय २१ वर्ष असावे. तसेत काही प्रवर्गांना यात सूट देण्यात येईल.
शैक्षणिक पात्रतेचा विचार करता, एकूण तीन प्रकारचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. यात, १२व्या वर्गात फिजिक्स, मॅथ्स आणि इंग्लिश विषयांत प्रत्येकी किमान ५० गूण मिळवलेले असावेत. तसेच, ज्या उमेदवारांनी मॅकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कंप्यूटर सायंस आदि. ट्रेडमध्ये तीन वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला असावा आणि त्यातही किमान ५० % गुण मिळवलेले असावेत…
याशिवाय, दोन वर्षांचा व्होकेशनल कोर्स करणारे उमेदवारही यासाठी अर्ज करू शकतात. मात्र व्हेकेशनल कोर्समध्ये फिजिक्स आणि मॅथ्स हे विषय असणे आणि इंग्रजी विषयात ५० टक्के गुण अससणे आवश्यक आहे.
अशी होणार निवड
अग्निवीर वायू (AGNIVEERVAYU) भर्ती प्रक्रियेत सर्वप्रथम ऑनलाइन लेखी परीक्षा होईल. यानंतर, फिजिकल फिटनेस टेस्ट (PST/PET), कागदपत्र पडताळणी आणि नंतर वैद्यकीय तपासणी, या सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
किती मिळणार सॅलरी ?
अग्निवीर वायू (AGNIVEERVAYU) यांना पहिल्या वर्षी दरमहा ३०,००० रुपये एवढी सॅलरी मिळेल, जी दरवर्षी वाढत जाईल. चौथ्या वर्षापर्यंत ही सॅलरी दरमहा ४०,००० रुपयांपर्यंत पोहोचेल. याशिवाय, सेवा पूर्ण झाल्यावर, अग्निवीरांना सुमारे १०.०८ लाख रुपयांचा सेवा निधी करमुक्त स्वरुपात दिला जाईल.
असा करा अर्ज
सर्व प्रथम agnipathvayu.cdac.in वेबसाइटवर जा. तेथे, दिसत असलेल्या “New Registration” लिंकवर क्लिक करा येथे अर्जासंदर्भात संपूर्ण माहिती मिळेल. यानंतर अर्जासाठी लॉग इन करून अर्ज करा. आवश्यक कागदपत्रे जसे की स्वाक्षरी, फोटो आदि अपलोड करा. यानंतर, अर्जाचे शुल्क भरून फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी फॉर्मची प्रिंटआउट सांभाळून ठेवा.