चिपळूण भाजपकडून चित्रकारांना व्यासपीठ, नितेश राणेंना वाढदिवसाची अनोखी भेट…

Spread the love

चिपळूण | प्रतिनिधी: भाजपच्या वतीने चिपळूणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनातून नामवंत व उदयोन्मुख चित्रकारांना समाजासमोर आणण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या प्रदर्शनात मंत्री नितेश राणे यांच्या विविध हावभावांचे हुबेहूब स्केचेस साकारण्यात आले असून, ही चित्रं पाहताना ‘ही चित्र नसून फोटोच आहेत’ असे प्रतिपादन माजी सभापती पूजा निकम यांनी केले.

सावरकर सभागृहात चिपळूण शहर भाजपच्या वतीने आयोजित या विशेष प्रदर्शनात नामवंत चित्रकार शिक्षक सुशीलकुमार कुंभार आणि ओम देवळेकर यांच्या कलाकृतींचा गौरव करण्यात आला. यावेळी पूजा निकम म्हणाल्या, “भाजपने प्रसिद्धीपासून दूर असलेल्या चित्रकारांना समाजासमोर आणण्याचे काम केले आहे. नितेश राणे साहेबांच्या डोळ्यातील भाव, चेहऱ्यावरील हावभाव अत्यंत प्रभावीपणे स्केचिंगमध्ये उतरवले आहेत.”

या वेळी राज्य पुरस्कारप्राप्त चित्रकार संतोष जाधव सर यांनी देखील गुरू-शिष्य परंपरेतून आलेल्या या उत्कृष्ट चित्रकलेचे विशेष कौतुक करत “ही चित्र म्हणजेच वास्तवाचे हुबेहूब प्रतिबिंब आहे,” असे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक शशिकांत मोदी यांनी केले. आशिष खातू व रसिका देवळेकर यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. “चित्रकलेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची पद्धत ही एक अनोखी कलाविष्काराची ओळख आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी रामदास राणे, अभय चितळे, मधुकर निमकर, अनिल सावर्डेकर, निनाद आवटे, प्रदीप शीतप, शुभम पिसे, अभिषेक जागुष्टे, उल्हास भोसले, नरेंद्र बेलवलकर, महेश शिंदे, संकेत चिले, मनाली जाधव, शीतल रानडे, सारिका भावे, अश्विनी वरवडेकर, प्रणाली सावर्डेकर, प्रणय वाडकर, मंगेश चिले, राजेश भूरण आदी मान्यवर उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page