
मंडणगड – (प्रतिनिधी)- येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक योगा प्रशिक्षक श्री. दिनेश पेडणेकर हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, एन.एस.एस. कार्यक्राधिकारी प्रा. संदीप निर्वाण, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. संगीता घाडगे, आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण यांनी प्रस्ताविक करुन कार्यक्रमाचा उद्देष सागताना जागतिक योगदिनाचे महत्व विशद केले.
यावेळी श्री. दिनेश पेडणेकर यांनी सांगितले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले शारिरिक व मानसिक आरोग्य सृदृढ राखण्यासाठी योगसाधना करणे गरजेचे आहे. आज व्यायामाचा अभावामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. बाजारामध्ये उपलब्ध होणा-या विविध भेसळयुक्त खाद्यपदार्थ, भाजीपाला व फळांवरील रासायनिक प्रक्रिया याचे माणसांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो ही चिंतनीय बाब असून त्यावर उपाय म्हणून आपण योग्य व पोषक आहार सोबत नियमित व्यायाम याची सांगड घालणे गरजेचे आहे.यावेळी त्यांनी प्रात्यक्षिकासह सर्वांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर म्हणाले की, आज सुदुढ व निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगाची अत्यंत गरज असून विद्याथ्र्यांनी आपले शरीर निरोगी बनवायचे असेल तर योग साधना आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, एन. एस. एस. स्वयंसेवक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. संगीता घाडगे यांनी तरी शेवटी प्रा. संदीप निर्वाण यांनी मानले.