चिपळूण शहरात वारंवार वीज खंडिततेच्या समस्येबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन..

Spread the love

चिपळूण- चिपळूण शहरात वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिपळूण तालुका व शहर पदाधिकाऱ्यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयात भेट देऊन अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री. कोंडल साहेब व श्री. कांबळी साहेब यांच्याशी झालेल्या या बैठकीत शहरातील सतत खंडित होणारा वीजपुरवठा, तक्रार निवारण प्रणालीतील त्रुटी, आपत्ती व्यवस्थापन पथकाची आवश्यकता, मुरादपूर सब स्टेशनची परिस्थिती, शहरातील झाडेझुडुपांची छाटणीसंबंधी प्रलंबित कामे, तसेच अधिक तक्रार निवारण क्रमांक उपलब्ध करून देण्याची गरज याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

पक्षाच्या शिष्टमंडळाने महावितरण अधिकाऱ्यांकडे शहरवासीयांच्या वतीने लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. अन्यथा पक्षाकडून कठोर भूमिका घेण्यात येईल तसेच कायदेशीर पर्यायाचा विचार केला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या चर्चेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व मागण्यांवर गांभीर्याने विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही दिली. यावेळी तालुकाध्यक्ष श्री. मुरादभाई अडरेकर, शहराध्यक्ष श्री. रतनदादा पवार, शहर उपाध्यक्ष श्री. राकेश दाते, श्री. कादीर भाई मुकादम, सेक्रेटरी श्री. मनोज दळी, युवक तालुकाध्यक्ष श्री. रोहन नलावडे, शहर युवकाध्यक्ष श्री. श्रीनाथ खेडेकर, परवेझ मेमन, सलमान मेमन, महिला पदाधिकारी सौ. रूही खेडेकर, सौ. राधिका तटकरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page