सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात संपन्न,‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योगा’ या संकल्पनेवर भर…

Spread the love

चिपळूण- सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळा, खेर्डी-चिंचघरी (सती) येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योगा’ ही संकल्पना समोर ठेवून विद्यालयात योगदिनाचे भव्य आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्दल जागृती निर्माण व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने झाली. योग ही भारताची अमूल्य देणगी असून, आज जगभरात त्याचे महत्त्व वाढले आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत नियमित योगसाधनाही अंगिकारावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. विद्यालयाच्या सभागृहात मोठ्या स्क्रीनवर योगासनांचे माहितीपट व प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. शिक्षिका सौ. रश्मी राजेशिर्के, श्री. संदेश सावंत, सौ. विनया नटे, श्रीम. अर्चना देशमुख, श्रीम. ज्योती चाळके व सौ. शितल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर केली.

या कार्यक्रमात ओंकार, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, पवनमुक्तासन, भद्रासन, कपालभाती, प्राणायाम, त्रिकोणासन, ताडासन आणि शवासन यांसारख्या योगासनांचा सराव विद्यार्थ्यांनी केला. योगदिनीचे महत्त्व आणि त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी सविस्तर माहिती श्रीम. वृषाली राणे यांनी विद्यार्थ्यांना दिली. या उपक्रमाचे संयोजन सौ. विनया नटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये सौ. मनिषा कांबळी, सौ. अपूर्वा शिंदे, श्रीम. वृषाली राणे, श्रीम. अर्चना देशमुख, श्रीम. ज्योती चाळके, सौ. रूपाली खरात, श्रीम. वर्षा सकपाळ, सौ. स्वरा भुरण, सौ. शितल पाटील यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच श्री. विनोद उदेग, श्री. एकनाथ चाळके, सौ. विजया मौजे, श्री. समीर इंगावले, श्रीम. अनिता चाळके आणि सौ. प्रतिभा तांबिटकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page