पैसा फंड इंग्लिश स्कूल मध्ये योग दिन उत्साहात साजरा, विद्यार्थ्यांना देण्यात आले योगासनाचे धडे व फायदे…

Spread the love

संगमेश्वर :अर्चिता कोकाटे /नावडी- पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये 21 जून हा योग दिन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रशालेमध्ये सकाळी संस्थेचे सचिव  श्री धनंजय शेट्ये सर,  मुख्याध्यापक खामकर सर,  ज्येष्ठ शिक्षक दळवी सर, सर्व  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांनी मिळून एक तास योग वर्गाचे आयोजन केले होते.
   

या योगासनामध्ये योगाचे विविध प्रकार घेण्यात आले. प्राणायाम, सूर्यनमस्कार, कपाळभाती, ताडासन, वृक्षासन, वज्रासन,  हास्य योगा असे विविध प्रकार घेण्यात आले.
     

प्रशालेतील शिक्षक श्री ढोर्लेकर सर यांनी मुलांना  योगासनाचे महत्त्व व फायदे समजावून सांगितले. जीवनामध्ये योगासन आणि प्राणायाम याचे किती महत्त्व आहे व त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे जीवन हे तंदुरुस्त व निरोगी कसे राहते  त्याप्रमाणेच बुद्धी चा विकास होतो याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
  

आजच्या योग दिनाचा उत्साह विद्यार्थ्यांमध्ये वेगळाच दिसून आला. अत्यंत उत्साहाने विद्यार्थ्यांनी  छान पैकी प्रतिसाद दिला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page