
राजापूर : शहरातील दिवटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा गुजराळी येथे माजी नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांच्या हस्ते व सामाजिक कार्यकर्ते अमृत तांबडे यांच्या संकल्पनेतून वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी गुजराळी शाळेच्या आवारात स्थानिक प्रजातीची झाडे लावण्यात आली. यावेळी वाडीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश बाईत्, न्यु हनुमान दिवटेवाडी मंडळ अध्यक्ष गिरीष वादक, केंद्र प्रमुख श्री. जायदे,यांच्या सह शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विचारे, शिक्षक श्रीमती देसाई, श्रीमती हातणकर, श्रीमती शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्षा सर्व सदस्य तसा पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
माजी नगरध्यक्ष जमीर खलिफे यांचे गुजराळी शाळेवरील लक्ष अजूनही प्रशासकीय राजवटीत आहे हे त्यांनी पुन्हा दाखवून दिले, यापूर्वी शाळेवरील छप्पर दुरुस्ती, तसेच शाळेसमोरील मैदान करणे ही कामे त्यांनी स्वखर्चाने केलेली आहेत.