
संगमेश्वर- शालेय नवीन वर्षाला सुरवात झाली या निमित्ताने कोसुंब गावातील पूर्ण प्राथमिक शाळा कोसुंब नंबर १ आदर्श शाळा कोसुंब नंबर २ काेसुबं रामवाडी शाळा कोसुंब रेवाळवाडी शाळा शाळेतील नवागत शालेय विद्यार्थ्यांसाठी निर्मल ग्रामपंचायत कोसुंब च्या वतीने स्वागत व खाऊ वाटप व दिंडी प्रभात फेरी या सारखे विविध उपक्रम शाळेतील विद्यार्थ्यांकडून राबवण्यात आले.
तसेच शासनाच्या वतीने आलेली पाठयपुस्तके इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थी यांना देण्यात आली त्याच बरोबर आदर्श शाळा कोसुंब नंबर १मध्ये मागील वर्षी मध्ये विशेष मंथन BDS परीक्षेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी यांना प्रमाणपत्रे व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले
या वेळी निर्मल ग्रामपंचायत कोसुंब चे उपसरपंच श्री दिनेश जाधव, ग्रामपंचायत सदस्या साै दिव्या जाधव, साै.संपदा जाधव, ग्रामविकास अधिकारी श्री सुभाष घडशी, मुख्याध्यापक श्री नरोटे, श्री माने, मुख्याध्यापिका साै कंरबेळे, साै निमकर सह शिक्षकां साै पाटिल, साै देसाई, अंगणवाडी सेविका साै जाधव साै लिंगायत, साै बने, साै खांबे सर्व अंगणवाडी मदतनीस शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री सत्यजित आयरे श्री सुशिल जाधव श्री विजय रेवाळे, पालक ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते