
अर्चिता कोकाटे /नावडी संगमेश्वर- मुंबई गोवा हायवे काम चालू आहे. मुंबई गोवा हायवे वरती सोनवी फुल येथे उल्लडान पुलाचे काम चालू असल्याने काम चालू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. पोलीस प्रशासनावर होणारा अतिरिक्त भार बघता प्रचंड ताण संगमेश्वर पोलीस ठाण्यावरती आहे. काल रात्री पडलेल्या पावसामुळे संगमेश्वर मध्ये चिखलाचे साम्राज्य झाले होते. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर मोरी टाकण्याचे काम करत होता. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी संगमेश्वर पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक विजया तांबडे आता मध्ये छत्री घेऊन भर पावसामध्ये आपले कर्तव्य पार पाडत होत्या.
भर पावसामध्ये केलेल्या वाहतूक कोंडी व पाईप लाईन टाकण्याचे काम सर्वावर त्या जातीनिशी लक्ष टाकून होत्या त्यामुळे काम करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला सोपे झाले होते. पाऊस आणि नागरिकांचा संताप या सर्वांना संयम पणे काम करून घेतल्याबद्दल नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.




संगमेश्वर बाजारपेठेतून रविवार जाणारी वाहतूक आणि देवरुख मुंबई रत्नागिरी यात तिन्ही मार्गावरील वाहतूक त्यांनी संयमाने पावसामध्ये भिजून आपले कर्तव्य बजावले आहे. ड्युटीवर असताना आपली ड्युटी योग्य प्रकारे कसे पार पाडावे याचा आदर्शच असते नि घालून दिलेला आहे. त्यामुळे सर्वांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया तांबडे यांची भर पावसात उल्लेखनीय कामगिरी…
सध्या पावसाला दमदारपणे सुरुवात झालेली आहे. सोनवी पुलाच्या कडेला बाजारात जाणाऱ्या रस्त्यावर पाईपलाईनचे काम सुरू असताना बाजारपेठेतून येणारी माणसे स्टॅन्ड कडे जात होती. त्यावेळी उर्वरित तिन्ही रस्त्यावरील वाहने येत असताना त्यांना मार्गस्थ करणे ही महत्त्वाची कामगिरी रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून तसेच तिन्ही मार्गावरील येणाऱ्या वाहनांना मार्ग दाखवणे त्यावेळी महामार्गावर ड्युटीवर असणाऱ्या महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया तांबडे भर पावसात करताना दिसत होत्या. एका हातात छत्री व दुसऱ्या हाताने वाहने व पादचारी यांना सुखरूप मार्गस्थ करणे हे जीकिरीचे असते.
ती जबाबदारी त्या व्यवस्थितपणे पार पडताना दिसतात.भर पावसात त्या ड्युटीवर असलेल्या मितभाषी, शांत स्वभाव आणि नेहमी सहकार्याची भावना असलेल्या म. सहाय्यक पो.उपनिरीक्षक विजया तांबडे यांच्या कामगिरीबद्दल नागरिकात समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
उपनिरीक्षक विजया तांबडे यांचा अत्यंत मनमिळाऊ स्वभाव आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये महिला दक्षता कमिटी आणि सुरक्षा कमिटीचे महिला सदस्य यांची महिन्याला मीटिंग घेत असताना देखील त्यांचे खूप सहकार्य महिला सदस्यांना मिळालेले आहे.