
दिनेश आंब्रे संगमेश्वर प्रतिनिधी- मुंबई गोवा हायवे वरती कॉन्ट्रॅक्टरच्या मनमानी कारभारामुळे चिखलाचे साम्राज्य नावडी ग्रामपंचायत मध्ये आले होते. सदर बातमी सकाळी प्रसिद्धी करण्यात आले होते. महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. सदर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर व हायवे प्रशासनाचा खोटेपणा उघड झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर ने भर पावसामध्ये मोरी टाकायचे काम त्वरित केलेले आहे.
मुंबई गोवा हायवे ची गटाराच्या कामासंदर्भामध्ये गेली अनेक दिवस कुलकर्णी साहेब उप अभियंता यांच्याशी बोलणे चालू आहे परंतु कॉन्ट्रॅक्टर कोणतीही दखल घेत नव्हता. चीप इंजिनियर संतोष शेलार यांनी स्वतः दौरा करून दोन दिवसापूर्वी कॉन्ट्रॅक्टरला सूचना करूनही कॉन्ट्रॅक्टरने गटाराची कामे केली नव्हती. गेली महिनाभर जनशक्तीचा दबाव अधिकाऱ्यांशी बोलणे करत आहे. हायवे संदर्भातील प्रश्न उपस्थित करून त्याचा पाठपुरावाही करत आहे. परंतु निगरगट्टा कॉन्ट्रॅक्टर कोणतीही कारवाई किंवा काम करत नव्हता. अखेर काल रात्री पडलेला पावसामुळे संगमेश्वर बाजारपेठेमध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी धारेवर धरल्यानंतर सविस्तर बातमी जनशक्तीच्या दबाव ने लावली होती सदर बातमीमध्ये वस्तुस्थिती मांडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ कारवाई करण्याचे आदेश कॉन्ट्रॅक्टरला दिल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरने त्वरित सिमेंटच्या मोरी टाकण्यात आल्या आहेत.
15 ऑगस्ट पासून मुंबई गोवा हवेच्या कामासंदर्भामध्ये जनशक्तीचा दबाव पाठपुरावा करत आहे. संबंधित मुंबई गोवा हायवे 15 जानेवारीला ही पाठपुरावा केला होता. अधिकाऱ्यांशी स्वतः आमचे प्रतिनिधी पाठपुरावा करत आहेत. संबंधित यंत्रणेच्या गल्लथान कारभाराविरोधात मध्यंतरी आमरण उपोषण ही करण्यात आली होती. त्यानंतर जवळजवळ 42 टक्के रस्ता पूर्ण झालेला आहे. जनशक्तीच्या दबाव न्यूज परिवाराचे हे मोठे यश आहे. दबाव परिवाराचे 15 ऑगस्ट पासून केलेल्या पाठपुरावाचे आरवली पासून तळेकंठे पर्यंत रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणात झालेले आहे.
मोरी व गटाराचे काम केल्यामुळे मिळणार नागरिकांना दिलासा…
बातमीच्या इफेक्ट मुळे व राष्ट्रीय महामार्गाकडे केलेल्या पाठपुरावा मुळे मोरे टाकण्याचे काम मध्ये पातळीवर करण्यात आले. त्यामुळे संगमेश्वर बाजारपेठेत येणारे पाणी थांबले आहे. जोपर्यंत मुंबई गोवा हायवे चे काम पुढील वर्षभरात पूर्ण होत नाही. तोपर्यंत जनशक्तीचा दबाव परिवार पूर्णपणे पाठपुरावा करणार आहे. रस्त्याला गेलेले तडे रस्ता फोडून जोपर्यंत काम पूर्ण करून कॉन्ट्रॅक्टर देत नाही. व कॉन्ट्रॅक्टर वर सदोष मनुष्य त्याच्या गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत दबाव परिवार याचा पाठपुरावा करत राहणार आहे. दबाव च्या वतीने करण्यात आलेले आमरण उपोषण व संपादकांना दिलेले लेखी आश्वासन तोपर्यंत राष्ट्रीय महामार्ग पूर्ण करत नाही तोपर्यंत आमची लढाई चालू राहणार आहे असे संपादकांनी यावेळी सांगितले.
नागरिकांकडून बातमी लावून पाठपुरावा केल्याबद्दल केले जात आहे कौतुक…
संगमेश्वर बाजारपेठेतील येणाऱ्या चिखलावरती बातमी लावून त्वरित उप अभियंता कुलकर्णी साहेब व त्यांचे वरिष्ठ घाडगे साहेब यांच्याशी बोलने केले आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टरला त्वरित काम करण्याची सूचना देण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांनी दबाव परिवाराचे आभार मानले आहेत. नागरिकांच्या घेतलेल्या प्रतिक्रियांच्या परिणाम दिसून आलेला आहे. कॉन्ट्रॅक्टरने सकाळी चिखल बाजूला करून रस्त्याची साफसफाई करून दिलेली आहे. सदर बातमीसाठी व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांनी दबाव परिवाराचे धन्यवाद मानलेले आहेत.