देवरुख पोलीस ठाण्याच्या कारवाईमध्ये “गोवंश वाहतूक करणाऱ्या एका इसमावर कारवाई”…

Spread the love

देवरुख: देवरुख पोलीस ठाण्याने गोवंश वाहतूक करणाऱ्या एका इसमावर मोठी कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली.

माहितीनुसार, 13 जून 2025 रोजी 20.35 वाजता देवरुख पोलीस ठाण्याच्या साखरपा पोलीस दूरक्षेत्रांतर्गत मुर्शी चेकपोस्ट येथे नियमित गस्ती करत असताना एक संशयित बोलेरो पिकअप वाहन (क्र. MH-08-M-4929) दिसून आले. वाहनाची अधिक तपासणी केली असता, त्यामध्ये दोन बैल बांधलेले आढळले.

सखोल चौकशीत, वाहन चालक सागर नामदेव पाटील आणि इतर दोन्ही आरोपींनी गोवंश जनावरे अवैधपणे वाहतूक करत असलेची माहिती समोर आली. त्यांना वेदना होऊ नयेत म्हणून दोन्ही बैल ताडपत्रीने बंदिस्त केले होते, तसेच गुरांची वैद्यकीय तपासणी न करता त्यांना वाहतूक केली जात होती. आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, 1976, प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम 1960, मोटार वाहन कायदा 1988, तसेच अन्य संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदवला आहे.

गुन्ह्यातील आरोपी: सागर नामदेव पाटील, वय 31, व्यावसायिक चालक, रा. पिशवी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर. प्रदीप अरुण लाटवडेकर, रा. पिशवी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर. नागेश कदम, रा. देवरुख बौद्ध वाडी. या गुन्ह्यात एक सफेद रंगाची महिंद्र बोलेरो पिकअप गाडी (₹3,50,000/- किमतीची), दोन बैल (₹13,000/- आणि ₹10,000/- किमतीचे) जप्त करण्यात आले असून गोवंश बैलांची सुटका केली आहे.

या कामगिरीचे श्रेय मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. यशवंत केडगे आणि देवरुख पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page