
दिनेश आंब्रे /संगमेश्वर प्रतिनिधी- संगमेश्वर बस स्थानक कॉन्ट्रॅक्टरच्या मनमानी कारभारामुळे अवकाळी पावसामुळे संपूर्ण चिखल साठला होता. त्यानंतर महामार्ग प्रशासनाने उपाययोजना करावयास सांगितल्या होत्या. दोन दिवसात पूर्वी संतोष शेलार चीफ इंजिनियर महाराष्ट्र यांनी कॉन्ट्रॅक्टरला उपाययोजना त्वरित करावयास सांगितल्या होत्या परंतु अवकाळी पाऊस होऊन महिनाभराचा कालावधी गेला तरीही कोणती उपाययोजना न केल्याने थोर एसटी स्टँड चिखलाचे साम्राज्य आज दिसून आले आहे . नागरिकांना चे प्रचंड हाल झालेले आहेत
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली.यामुळे संगमेश्वर बस स्थानकाच्या परीसरात चिखलाचा थर साचला आहे. त्यामुळे प्रवाशांना त्या चिखलातून मार्ग काढताना खूप कसरत करावी लागते आहे.
संगमेश्वर बस स्थानकाच्या बाजूला गटार, पुलाचे काम सुरू आहे. खोदकामादरम्यान कडेला ठेवलेले मातीचे ढीग या समस्येचे मूळ कारण आहे. पावसाने नुकतीच सुरुवात केली आणि स्थानक परिसरात चिखल साचला.यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
स्थानकावरील चिखल आणि पावसाच्या पाण्याचा विसर्ग नियमीत व्हावा, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.या दृष्टीने खबरदारी घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.