
संगमेश्वर नावडी :अर्चिता कोकाटे- परीक्षा संपताच मुले पिकनिकला जाणे, विविध खेळ खेळणे, कॅरम क्रिकेट खेळणे तसेच पोहणे, झोपाळा करून झाडाला लोंबकळणे, ढोलकी तबला वाजवणे, जंगलातील भटकंती, कॅसीओ, हार्मोनियम, मृदुंग, पावरी आदि वाद्य वाजवणे व त्यांची नियमित संगत करून सुट्टीत मनमुराद आनंद लुटतात.
सध्याची मे महिन्याची सुट्टी काही मुलांनी सध्याच्या जमान्यात कॅसिओ वादनाचे महत्त्व जपून घेऊन ते वाजवायला शिकणे आधी छंद जोपासताना दिसतात. यामध्ये शौर्य समीर अंब्रे नावडी हा बालक ढोल वादन, पालखी नाचवणे, सध्याच्या सुट्टीत वडील समीर अंब्रे हे उत्कृष्ट भजन कार असल्यामुळे शौर्य सुट्टीत नाल व मृदुंग वाजवायची कला जोपासत आहे.

तर रामपेठ येथील रिजुल सचिन शेरे हा बालक कॅसिओ वर विविध गाणी वाजवायची कला स्वतःच विरंगुला म्हणून आत्मसात करताना दिसतो आहे. तो दोन भाऊ पारस व अन्वेष यांनाही सोबत घेऊन विविध वाद्य वाजवीत आहे.
निढळेवाडी येथील बालक सुयश साजन वाडकर हा देखील आपली सुट्टीत कॅसिओवर गाणी वाजवून, क्रिकेट खेळून मन मुराद आनंद व्यक्त करताना दिसतो.

अलक्ष अक्षय शेट्ये हा विशेषतः क्रिकेट प्रेमी असून क्रिकेटर ची पेन व पेन्सिलने स्केच काढणे व पत्ते तसेच कॅरम खेळण्यात सुट्टी घालवताना दिसत आहे. अलक्ष त्याची भावंड आर्या, आरोह, अथर्व आणि अनघ तसेच त्यांच्यासोबत त्यांचे आजोबा अनिल शेठ शेट्ये वय वर्ष 70 यांना घेऊन खेळ खेळण्यात आपली सुट्टी मजेत घालवताना दिसत आहेत.



सध्याच्या युगात मोबाईल सोडून मुलं पूर्वीचे खेळ खेळण्यात रमलेले दिसत असताना एक वेगळे चित्र यंदाच्या मे-जून महिन्यामध्ये दिसले आहे.
घरातील ज्येष्ठ मंडळींनी जर मुलांना पूर्वीच्या खेळाची माहिती करून दिली तर मुलं मोबाईल पासून निश्चितच दूर राहू शकतात याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.