
संगमेश्वर-;संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेले वाडी येथील समीर पाटील यांच्या लाकडी कोठारात बुधवारी दुपारी जातीवंत नाग जातीचा भला मोठा साप लपून बसला असल्याचे दिसून आले.
सुरेश तेली यांनी देवरुखचे सर्प मित्र श्री, उमेश पागार यांच्याशी संपर्क करून त्याना सापाला पकडण्या साठी विनंती केली असता ते तात्काळ कळंबस्ते तेले वाडी येथे येऊन त्या सापाला बाटलीत जे्रबंद करून त्याला देवरुख येथील वनविभागाच्या ताब्यात दिला.
त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या सापाला सुखरूप नैसर्गिक अधिवसात सोडल्याने त्या सापाला जीवदान मिळाले.