
संगमेश्वर. अर्चिता कोकाटे/नावडी- पोलिस ठाणे संगमेश्वर येथे नुकताच पदभार स्वीकारलेले पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांचा व्यापारी संघ संगमेश्वर यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला .
यावेळी व्यापारी संघाचे उपाध्यक्ष सुशांत कोळवणकर यांच्या शुभहस्ते पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सघाचे सदस्य गुरु प्रसाद भिंगार्डे, रोहीत कोकाटे,यश खातु, ओमकार लोध, जमनादास भानुशाली, शेखर पेणकर, अजिंक्य शेट्ये, इम्रान मेमन, अमोल लोध आदी उपस्थित होते.
संघाच्या वतीने पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.श्री चव्हाण साहेब यांनी समाधान व्यक्त केले व्यापारी संघास धन्यवाद दिले. सर्वतोपरी सहकार्य कारण असल्याचे यावे चव्हाण साहेब यांच्याकडून आश्वासन देण्यात आले.