बीबीए, बीसीए आणि बीएमएस कोर्ससाठी पुन्हा सीईटी घेण्याचा निर्णय राज्यसरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय..उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे आमदार शेखर निकम यांचा पाठपुरवठा..

Spread the love

*श्रीराम शिंदे/असुर्डे-* ५ जून २०२५ – राज्यातील बीबीए, बीसीए आणि बीएमएस अभ्यासक्रमांसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षात अनेक विद्यार्थी प्रवेश परीक्षेला (CET) हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे ते विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून वंचित राहण्याच्या स्थितीत होते. हा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन चिपळूण-संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला. त्यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी बीबीए, बीसीए आणि बीएमएस कोर्ससाठी पुन्हा सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळणार असून, त्यांना आता संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश घेणे शक्य होणार आहे.

आज वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी व प्राचार्य संघटनेच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली.

तसेच, बीबीए, बीसीए आणि बीएमएस कोर्सच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी, प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडथळे, तसेच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडून (AICTE) घेतले जाणारे संलग्नीकरण शुल्क व अनामत रक्कम कमी करण्याच्या मागणीवरही चर्चा झाली. यासाठी संस्थाचालकांच्या शिष्टमंडळाची AICTE चेअरमन यांच्यासोबत लवकरच भेट आयोजित केली जाणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

या महत्त्वपूर्ण बैठकीस शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे उपाध्यक्ष प्रताप (भैय्या) माने, प्राचार्य डी. आर. मोरे, एड. धैर्यशील पाटील, प्राचार्य व्ही. एम. पाटील, उच्च शिक्षण सचिव मा. वेणुगोपाल रेड्डी, संचालक शैलेंद्र देवळणकर, तंत्र शिक्षण संचालक विनोद मोहितकर, सहसंचालक प्रकाश बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page