
अखाच्या अखा गर्डर खाली ट्रॅक वर आल्याने कोकण रेल्वेच्या मार्गावरील काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.आज संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वेच्या मार्गावरील वेरवली खुर्द, मांडवकरवाडी येथे रेल्वे ट्रॅक वर दरड कोसळली होती.आणि कोकण रेल्वेच्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
त्यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरील सर्व गाड्या रखडल्या होत्या. मात्र तीन तासाच्या प्रयत्नानंतर ट्रॅक वरील दरड दगड माती बाजूला करून ट्रॅक पूर्ण मोकळा करून परत गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.कोकण रेल्वेच्या मार्गावरून आता गाड्या मंद गतीने धावत आहेत. दरम्यान पावसाळापूर्वी कोकण रेल्वेची महामार्गामार्गावरील पूर्वतयारी काय होती याबाबत आता शंका निर्माण झाली आहे.

कारण 15 मे पर्यंत कोकण रेल्वेच्या मार्गावरील कोकण रेल्वे प्रशासना कडून कसलीच खबरदारी घेण्यात आली नसल्याचे दिसून येते.कोकण रेल्वे च्या मार्गावर पावसाळ्यात ठीक ठिकाणी रेल्वेच्या मार्गांवर दरडी कोसळण्याची शक्यता असते. परंतु त्याची दक्षता किंवा काळजी अद्यापही घेतले नसल्याचे चित्र समोर आले आहे.
कारण अखाच्या अखा गर्डर खाली ट्रॅक वर आला म्हणजे तिथे एक तर वजन जास्त झाले असणार किंवा ते तुटण्याच्या तयारीत असणार त्यामुळे जाळी सहित दगड खाली आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावरील पावसाळ्या पूर्वी ची तयारी कोकण रेल्वे चे प्रशासन काय घेते याबाबत आता शंका निर्माण झाली आहे. दरम्यान आता कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत झाली आहे. रेल्वे मार्गावर पडलेले दगड हटवल्याने कोकण रेल्वेची दीड तास विलवडे जवळ थांबलेली वाहतूक आता पूर्ववत झाली आहे.
रेल्वे मार्गावर दगड पडल्याने विलवडेजवळ वाहतूक थांबलेली होती. हे दगड हटवल्याने थांबलेल्या रेल्वे मार्गस्थ झाल्या आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.