
मान्सून जर वेळेपूर्वी केरळमध्ये दाखल झाला तर २००९ नंतर भारतीय मुख्य भूमीवर मान्सून सर्वात लवकर दाखल होईल, असे आयएमडीने म्हटले आहे.
पुणे /प्रतिनिधी- मान्सून जर वेळेपूर्वी केरळमध्ये दाखल झाला तर २००९ नंतर भारतीय मुख्य भूमीवर मान्सून सर्वात लवकर दाखल होईल, असे आयएमडीने म्हटले आहे.
नैर्ऋत्य मोसमी वारे येत्या चार ते पाच दिवसांत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, मान्सून जर वेळेपूर्वी केरळमध्ये दाखल झाला, तर २००९ नंतर भारतीय मुख्य भूमीवर मान्सून सर्वात लवकर दाखल होईल. हवामान खात्याने यापूर्वी २७ मेपर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला होता.
याच कालावधीत दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भाग, मालदीव आणि कोमोरिनचा उर्वरित भाग, लक्षद्वीप परिसराचा काही भाग, केरळ, तामिळनाडू, दक्षिण आणि मध्य बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालचा उपसागर आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांमध्ये नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ” असे आयएमडीने म्हटले आहे.
एचटीने यापूर्वी वृत्त दिले होते की मे महिन्यात संपूर्ण भारतात असामान्य हवामान राहील, ज्यात वारंवार मेघगर्जनेसह धुळीचे वादळ आणि देशाच्या बहुतेक भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहील. मात्र, या विसंगतीचा नैर्ऋत्य मान्सूनच्या आगमनावर परिणाम होणार नाही, अशी तज्ज्ञांची खात्री आहे.
देशात मान्सून सामान्य होण्यासाठी एक महत्त्वाचा घटक म्हणजे वायव्य भारतात तथाकथित ‘हीट लो’ तयार होणे. यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होतो जो मान्सूनच्या गर्तेतून ओलसर हवा शोषून घेतो. त्याच्या अभावी मान्सूनची कमतरता भासू शकते. सध्या ‘हीट लो’ नाही, पण आयएमडी आणि स्वतंत्र शास्त्रज्ञांनी मान्सून आपल्या सामान्य आगमनाच्या तारखेपूर्वीच दाखल होईल, असे म्हटले आहे.
२१ मे च्या सुमारास कर्नाटक किनारपट्टीवर पूर्व-मध्य अरबी समुद्रात अपर एअर सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे २२ मेच्या सुमारास याच भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते उत्तरेकडे सरकण्याची आणि आणखी तीव्र होण्याची शक्यता आयएमडीने मंगळवारी व्यक्त केली.