(मकरंद सुर्वे संगमेश्वर )
जनशक्तीचा दबाव न्यूज नेटवर्क
रत्नागिरी- संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक येथील ग्राममंदिर क्रमांक 2 ला 125 वर्षे पूर्ण झाली. सकाळी 7 वाजता देवींची चंदेरी रूपे पालखीत लावण्यात आली. नूतन सभागृहाचे या निमित्ताने वास्तुपुजन करून मंदिरात मंत्राघोष व पाठपठणाने धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला . सत्यनारायण महापूजा महाप्रसाद, कळस पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कडवई , येगाव,कुंभारखाणी परिसरातील बहुसंख्य भक्त मंडळी देवींचे आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या भक्तिभावाने हजर होती. महिलांचे हळदीकुंकू सौ स्नेहल शिरीष सुर्वे,सौ शलाका विकास सुर्वे, सौ संगीता विजय सुर्वे, शितल संजय साळवी, सौ राजेश्री राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरीत्या आयोजित करण्यात आले.
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त श्री विकास आबाजी सुर्वे लिखित सिहावलोकन या स्मरणिकेचे प्रकाशन आमदार श्री शेखर निकम सर यांच्या हस्ते थाटामाटात संपन्न झाले प्रसंगी आमदार श्री शेखर निकम यांचा सत्कार मंदिर समिती अध्यक्ष श्री विजय तातोजी सुर्वे यांच्या हस्ते तर ज्यानी पुस्तिका लेखन केले ते मंदिर सचिव श्री विकास आबाजी राव सुर्वे यांचा सत्कार मा. आमदार श्री शेखर सर निकम यांच्या हस्ते करण्यात आला.
मंदिर सभागृह दर्शनी भिंत विद्युतीकरण करून आपल्या दातृत्वाने देवी व समाज सेवा करणाऱ्या श्री विनायकराव जयशिंगराव सुर्वे, परिसरात बैठक व्यवस्थेकरिता बेंचेस देणारे श्री उमेश प्रभाकरराव सुर्वे, मंदिर पायऱ्या व कळस देणारे श्री शिरीष कांशीरामराव सुर्वे, असंख्य देणगीदार यांचेही कौतुक करण्यात आले.
मंदिर समिती मुंबई अध्यक्ष श्री विश्वास नरसिंग सुर्वे,खजिनदार श्री नरेंद्र शांताराम सुर्वे ,सचिव श्री नंदकिशोर हरी सुर्वे, स्थानिक खजिनदार श्री सचिन शशिकांत सुर्वे, उपाध्यक्ष श्री कृष्णकांत रामचंद्रराव सुर्वे, सहसचिव श्री संजय हरिश्चंद्र सुर्वे, कार्याध्यक्ष श्री राजेंद्र यशवंतराव कदम यांचे व सर्व समाज ऐक्य देणगीदार यांचे आभार सूत्रसंचालन करण्याऱ्या श्री नरेंद्र परशुराम सुर्वे यांनी मानून शिमगोत्सवाच्या शुभेच्छा ही दिल्या आणि कार्यक्रमाची सांगता केली. प्रसंगी आमदार श्री शेखर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य उठावदार होते.