
*मुंबई प्रतिनिधी –* धारावीत भीषण स्फोट झाला आहे. सिलेंडरच्या ट्रकला आग लागल्याने एकामागोमाग एक स्फोट झाले आहेत. ट्रक मधील सिलेंडरचे एकामागून एक स्फोट झाले.
धारावी भीषण स्फोटांनी हादरली, सिलेंडरच्या ट्रकला आग लागल्याने एकामागोमाग एक स्फोट
धारावीत भीषण स्फोट झाला आहे. आहे. सिलेंडरच्या ट्रकला आग लागल्याने एकामागोमाग एक स्फोट झाले आहेत. सिलिंडर स्फोटांच्या आवाजाने आजूबाजूचा परिसर दणाणून गेला. धारावीच्या पीएनजी कॉलनी जवळ नेचर पार्क येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलग 15 ते 20 सिलेंडरचा स्फोट झाला आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. अद्याप तरी कोणी जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही.