रायगड आता लोकलशी जोडले जाणार, पनवेल ते कर्जत मध्य रेल्वेचा नवा कॉरीडॉर सुसाट…

Spread the love

रायगड जिल्ह्याला आता उपनगरीय लोकल मार्गाशी जोडले जाणार आहे. मध्य रेल्वेच्या नव्या पनवेल – कर्जत उपनगरीय कॉरीडॉरमुळे कर्जत पट्ट्यातील प्रवाशांना आता सीएसएमटीला पोहचण्यासाठी कर्जत व्हाया पनवेल – सीएसएमटी असा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.

रायगड /प्रतिनिधी- मध्य रेल्वेचा पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉरने एक महत्त्वाचा पल्ला गाठला आहे. या मार्गावर पहिली माल वाहतूक करणारी ट्रेन शनिवारी सकाळी पाच वाजता महोपे स्थानकातून दाखल झाली आहे. या ट्रेनमध्ये SAIL कंपनीने दिलेले २६० मीटर लांब, ६० किलो वजनाचे रेल्वे रुळ येथे आणण्यात आले आहेत. हे रेल्वे रुळ आता येथे अंथरण्याचे काम सुरु होणार आहे. पनवेल आणि कर्जत या मार्गावर आधी मालगाड्या आणि काही लांबपल्ल्याच्या गाड्या चालायच्या. आता मात्र या मार्गाचे दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

रुळ टाकण्याच्या कामाला वेग येणार-

आधी मध्य रेल्वेने दिलेल्या रेल्वे रुळांचा वापर करून पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉरचे काम सुरु होते. आता खास डिझाईन केलेल्या ट्रेन मार्फत End Unloading Rake (EUR Rake) नवे रुळ येथे येणे सुरु होणार आहे. त्यामुळे रुळ टाकण्याच्या कामाला वेग येणार आहे. महोपे-चिखले स्थानकांदरम्यान ट्रॅक जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता, विशेषतः डिझाइन केलेली EUR ट्रेन येथे आल्यामुळे नवीन रेल्वे ट्रॅक टाकण्याची प्रक्रिया वेगाने सुरु होणार आहे.

दोन्ही प्रकारे फायदा होणार-

महोपे आणि चिखले स्थानकांदरम्यानच्या ७.८ किमी लांबीच्या पट्ट्यासाठी रेल्वे रुळ आणण्याचे काम ही EUR ट्रेन करीत आहे. या विभागातील रुळ टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर, कर्जत आणि चौक स्थानक भागात पुढील रेल्वे रुळ टाकले जाणार आहेत. पनवेल – कर्जत कॉरिडॉरवरील कनेक्टिव्हिटी आणि क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्यामुळे उपनगरीय प्रवाशांना आणि मालवाहतूकीला दोन्ही प्रकारे फायदा होणार आहे.

नवा पर्यायी मार्ग मिळणार-

पनवेल ते कर्जत हा मध्य रेल्वेचा नवा पाचवा कॉरीडॉर जवळपास तयार झाला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ ( MRVC ) एमयूटीपी – ३ अंतर्गत पनवेल ते कर्जत उपनगरीय लोकल मार्गाचे काम करीत आहे. या मार्गामुळे आता मुंबईकरांना कल्याण-कर्जतहून सीएमएमटीला पोहचण्यासाठी नवा पर्यायी मार्ग तयार झाला आहे. कर्जतहून प्रवासी आता लवकरच पनवेल मार्गे हार्बरने मुंबईत पोहचू शकणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ( कल्याण ते सीएसएमटी ) काही कारणाने जर बिघाड झाला तर नवा पर्यायी मार्ग मिळणार आहे.

एकूण पाच स्थानके-

या मार्गावर एकूण पाच स्थानके असणार असून त्यामुळे रायगड मुंबईला जोडले जाणार आहे. या मार्गासाठी २,७८२ कोटीचा अंदाजित खर्च आला आहे. या मार्गाचे ७० टक्के फिजीकल काम पूर्ण झाले आहे.

मंजूरी आणि जमीन संपादन कुठवर आले..

अंदाजित खर्च :  २,७८२  मंजूर

सर्व ७० जनरल आराखड्यांना मंजूरी, दोन रेल्वे पुलांसह तीन बोगद्यांचे कामांना मंजूरी

सर्व ७० आराखड्यांना मंजूरी

पाच रेल्वे स्थानकांचे इंजिनिअरिंग स्केल प्लान मंजूर

पाच रेल्वे स्थानके :

मोहोपे,

चौक,

कर्जत,

चिखले

पनवेल

जमीन संपादनाची स्थिती –

खाजगी जमीन – संपूर्ण ५६.८२ हेक्टर जमीन संपादीत

सरकारी जमीन – ४.४ हेक्टर्स संपूर्ण संपादन पूर्ण

खाजगी जमीन – संपूर्ण ५६.८२ हेक्टर संपादन पूर्ण

वन जमीन – पहिला टप्प्यात ९.१८ हेक्टर जमीन मंजूरी

ठाणे सीसीएफने मंजूरी दिल्यानंतर काम सुरु होणार

सिव्हील आणि स्ट्रक्चर वर्क स्थिती
महत्वाच्या लहान आणि मोठ्या पुलांचे अर्थ वर्क आणि कन्स्ट्रक्शन प्रगतीपथावर

पुलाच्या अर्थवर्क आणि पुलाच्या कामाचे कंत्राट वाटप…

४७ पुल आणि पादचारी पुल तयार, उड्डाण पुलांसह १६ पुलांचे काम सुरु

स्टेशन आणि सर्व्हीस बिल्डींग –

पनवेल, चिखले, मोहापे, चौक आणि कर्जत स्थानक बांधण्याचे कंत्राट वाटप

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page