
*संगमेश्वर दि १४ मार्च-* संगमेश्वर बाजारपेठ रस्त्यावर
सिमेंट काँक्रिटीकरणाच्या सळ्या रस्त्यावर आल्याने पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच ग्राहक वर्ग त्रस्त झाला आहे. संबधीत यंत्रणेने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
संगमेश्वर बाजारपेठ सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता तयार केलेला आहे. गेले अनेक वर्षे हा रस्ता होईल झाली आहेत. संगमेश्वर बाजारपेठ गणेश मंदिराजवळ काम करीत असताना सळ्या वरती येऊन पादचारी या ठिकाणी पडत आहेत. तरी याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे