
*रत्नागिरी*: जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वैदही मनोज रानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या. रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांची बढतीने धाराशीव येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते.
वैदही रानडे यांनी रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी अशा विविध पदांवर काम केलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील त्यांना माहिती आहे. पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीमध्येही त्यांनी नियोजनबध्द काम केले होते. त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाल्यामुळे निश्चितच चांगला फायदा होणार आहे.